Home > मॅक्स रिपोर्ट > ग्रामविकास मंत्र्यांच्या गावाकडे जाणारा रस्ता खड्डेमय !

ग्रामविकास मंत्र्यांच्या गावाकडे जाणारा रस्ता खड्डेमय !

ग्रामविकास मंत्र्यांच्या गावाकडे जाणारा रस्ता खड्डेमय !
X

बीड - सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने, पाच वर्ष राज्यात आणि देशात सत्तेवर असलेल्या सत्ताधारी सरकारकडून गल्लीपासून ते नॅशनल हायवे पर्यंत, सर्व रस्ते केले असल्याचा दावा करत आले आहे.

मात्र, आजही अनेक महत्त्वाचे महामार्ग हे खड्डेमय आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे, बीड - परळी हा राज्य महामार्ग 89 किलोमीटर असून, या राज्य महामार्गावर रस्ता कमी आणि खड्डे जास्त झाले आहेत. प्रत्येक पाच दहा मीटर वर या महामार्गावर खड्डा आढळून येत आहे. विशेष म्हणजे बीड पासून सिरसाळ्या पर्यंतचा हा रस्ता पूर्णतः खराबच आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय..

गेल्या दोन-तीन वर्षापासून या खड्डेमय झालेल्या रस्त्याकडे, राजकीय पक्षासोबतच, प्रशासकीय मंडळांनी दुर्लक्ष केलं आहे. मुख्यतः हा खराब रस्ता माजलगाव चे विद्यमान आमदार, आर टी देशमुख यांच्या मतदारसंघांमध्ये येतो. मात्र, आमदार आर टी देशमुख यांच्यासह, खासदार प्रीतम मुंडे, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहेत.

आज या खराब रस्त्यामुळे, नागरिकांना मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मानदुखी, कंबर दुखी, पाठ दुःखी ही रोजचीच झाली आहे. गरोदर महिलेला हॉस्पिटलला न्यायचा असेल तर मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अनेक अपघात याठिकाणी खड्डेमय रस्त्यांमुळे झाले आहेत. मात्र, प्रत्येक दौऱ्यात बीड हुन परळीला आलिशान गाडी मध्ये जाणाऱ्या मंत्री महोदयांना हा रस्ता का करावा वाटला नाही ? हा प्रश्न वाहन धारकासह नागरिकांतून विचारला जातोय ! तर दुसरीकडे राज्याच्या विरोधी पक्षनेते हे देखील, या रस्त्याविषयी कधीच आक्रमक होताना दिसून आले नाहीत! ही देखील चर्चा नागरीकातून होतांना दिसून येत आहे..!

याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता वेळा संपर्क साधला , मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यामुळे या रस्त्याचं ग्रहण कधी सुटणार ? हाच मुख्य प्रश्न सध्या जनता उपस्थित करत आहेत.

Updated : 13 Oct 2019 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top