आज चौकीदार हल्ला करणार
Max Maharashtra | 31 March 2019 6:44 AM GMT
X
X
मैं भी चौकीदार मोहीम सुरू केल्यानंतर या मोहीमेच्या पुढच्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाच वाजता देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयम मधून पंतप्रधान कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
There are lakhs of Chowkidars in every part of India.
Here is where you can join a #MainBhiChowkidar programme nearest to your place of stay.
See you this evening! https://t.co/87zAQ9eJN9
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 31, 2019
देशभरातील पाचशे ठिकाणी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. देशभरातील लाखों चौकीदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणूकीत स्वतःला चौकीदार म्हणवून घेतलं होतं. त्यानंतर राफेल करारावरून भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर काँग्रेसने चौकीदार चोर हैं कँपेन सुरू केली होती. या कँपेन ला उत्तर देण्यासाठी मोदींनी मैं भी चौकीदार कँपेन सुरू केली आहे.
Updated : 31 March 2019 6:44 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire