Home > मॅक्स रिपोर्ट > मोदी भक्तांनी गांधीजींचा द्वेष करणे गरजेचे आहे का?

मोदी भक्तांनी गांधीजींचा द्वेष करणे गरजेचे आहे का?

महात्मा गांधी यांची जयंती असो वा पुण्यतिथी सातत्याने मोदी भक्तांकडून सातत्याने द्वेष पसरवण्याचे काम सुरू असते. त्यामुळे मोदी भक्तांनी महात्मा गांधी यांचा द्वेष करणे गरजेचा आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मोदी भक्तांनी गांधीजींचा द्वेष करणे गरजेचे आहे का?
X

जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्याविषयी मोदी भक्तांकडून द्वेष पसरवण्याचे काम सुरू असते. त्यातच महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी वारंवार गोडसे जिंदाबाद ट्रेंड चालवला जातो. त्यातच मॅक्स महाराष्ट्रने महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या व्यक्तीमत्वाचा कोणता पैलू आवडतो? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर @tulsirampotdukh नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून रिप्लाय करून महात्मा गांधी यांच्या अंथरुणात काही महिला असल्याचा एडिटेड फोटो ट्वीट केला आहे. त्यावर गाडलेले मुडदे का उकरून काढत आहात, मला सुखाने जगू द्या, अशा आशयाचा रिप्लाय करण्यात आला आहे.

महात्मा गांधी यांच्याबाबत टिपण्णी करताना बाळासाहेब लहाने यांनी ट्वीट करून तिरकसपणे महात्मा गांधी यांच्यावर टिपण्णी केली आहे.

महात्मा गांधी हे डान्स करत असल्याचे मीम्स मोदी भक्तांकडून व्हायरल करण्यात येत आहेत.

ठकुराईन मणिकर्णन ब्रम्ह या ट्वीटर अकाऊंटवरून महात्मा गांधी यांच्या फोटोंचा एक व्हिडीओ टाकण्यात आला आहे. तसेच इसलिए मैं गांधी से नफरत करती हुँ, असे म्हटले आहे.

सार्थक भावनकर यांनीही असाच एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये महात्मा गांधी यांचा द्वेष करण्यात आला आहे.

अजय त्यागी या ट्वीटर अकाऊंटवरून भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश असा नकाशा देण्यात आला आहे. ज्यामध्ये पाकिस्तान आणि बांग्लादेशला जोडणारा रस्ता भारतातून जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे नथुराम गोडसे यांनी योग्य केल्याचे म्हटले आहे.


मोदीभक्त गांधीजींचा द्वेष का करतात? याविषयी मॅक्स महाराष्ट्रने ज्येष्ठ पत्रकार कुमार सप्तर्षी यांच्याशी संवाद साधला. यावेळी कुमार सप्तर्षी यांनी सांगितले की, गांधीजी आणि भाजप किंवा आरएसएस यांच्यातील मुलभूत फरक हा राष्ट्रवादाचा आहे. गांधीजींचा राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक आणि भारतीय संस्कृतीशी सुसंगत होता. गांधीजींच्या राष्ट्रवादात सर्वसमावेशकता आणि सहिष्णूता आहे. मात्र देशात हिंदूत्वाचा पुरस्कार करणार असल्याचे म्हणायचे आणि मग अस्पृश्यतेवर उत्तर द्यायचे नाही, ही भूमिका भाजप आणि आरएसएसची आहे. त्यामुळे देशात हिंदू बहुसंख्य आहे, असं म्हणायचं आणि गावोगाव ज्या जाती बहुसंख्य आहेत. त्यांचे वर्चस्व ठेवायचं, असा त्यांचा राष्ट्रवाद आहे. मात्र गांधींनी मी हिंदू आहे आणि हिंदूंचा अर्थ अहिंसा आणि सहिष्णूता असल्याचे म्हटले आहे. सत्य आणि साधनांचा विकास असल्याची व्याख्या केली. त्यामुळे गांधी हा मोदी भक्तांसाठी अडथळा आहे. म्हणून गांधी आधी मनातून मारण्यासाठी त्यांनी वेगळाच गांधी सांगितला आणि त्या गांधींचा खून केला. द्विराष्ट्रवादाचा सिध्दांत मांडणाऱ्यांना गांधीचा एकात्मतेचा राष्ट्रवाद नकोसा झाला. त्यामुळेच मोदीभक्त गांधीजींचा विरोध करतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

Updated : 10 Oct 2022 6:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top