शेकाप नेत्याची पत्रकारास मारहाण
Max Maharashtra | 23 May 2019 4:10 PM IST
X
X
अलिबागः रायगड लोकसभा मतदार संघात शेकापनं पाठिंबा दिलेल्या सुनील तटकरे यांचा झालेला निसटता विजय आणि मावळमध्ये शेकापनं जंगजंग पछाडल्यानंतरही तेथे राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा झालेला दारूण पराभव यामुळं रायगडपुरत्या सीमित राहिलेल्या शेकापला जोराचा झटका बसला आहे.शेकापची अडीच लाख मतं गेली कुठे हे जयंत पाटील देखील सांगू शकत नसल्याने संतप्त झालेल्या आमदार जयंत पाटील यांनी थोडयावेळापुर्वीच लोकसत्ताचे अलिबागचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांच्यावर भ्याड हल्ला करीत त्यांच्या कानशिलात लगावली ..विशेष म्हणजे पोलिसांसमोर आणि मतमोजणी केंद्रातच हा प्रकार घडला.काय वाट्टेल त्या बातम्या छापता काय असा प्रश्न विचारत ही मारहाण झाल्याचे समजते.
हर्षद कशाळकर यांना आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या मारहाणीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे.
Updated : 23 May 2019 4:10 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire