Home > मॅक्स रिपोर्ट > पहा विविध देशातील नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारा अवलिया

पहा विविध देशातील नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारा अवलिया

असे म्हणतात शौक बडी चीज हें. असाच काहीसा प्रत्यय बीड मधल्या एका कपडा व्यापार करणाऱ्या व्यक्तीमधे दिसून आला आहे. मोमीन रिजवान हे व्यवसायाने कापड विक्रेते आहेत. त्यांची असलेली हौस आणि त्यासाठीचा छंद थोडा वेगळा आहे. रिजवान यांच्याकडे एक दोन नव्हे तर 15 हून अधिक देशातील चलनी नोटांचा संग्रह आहे.बीड शहरातील कारंजा परिसरात मोमीन रिजवान मागील पंचवीस वर्षांपासून कापड व्यवसाय करतायत, पंधरा वर्षापासून वेगवेगळे देशातील नोटा आणि नाणे एकत्र करत ते आपला छंद जोपासत आहेत.

पहा विविध देशातील नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारा अवलिया
X

असे म्हणतात शौक बडी चीज हें. असाच काहीसा प्रत्यय बीड मधल्या एका कपडा व्यापार करणाऱ्या व्यक्तीमधे दिसून आला आहे. मोमीन रिजवान हे व्यवसायाने कापड विक्रेते आहेत. त्यांची असलेली हौस आणि त्यासाठीचा छंद थोडा वेगळा आहे. रिजवान यांच्याकडे एक दोन नव्हे तर 15 हून अधिक देशातील चलनी नोटांचा संग्रह आहे.बीड शहरातील कारंजा परिसरात मोमीन रिजवान मागील पंचवीस वर्षांपासून कापड व्यवसाय करतायत, पंधरा वर्षापासून वेगवेगळे देशातील नोटा आणि नाणे एकत्र करत ते आपला छंद जोपासत आहेत.

रिझवान यांच्या पूर्वजांनी संग्रहित केलेल्या नाण्याला 204 वर्षांचा इतिहास आहे.मोमीन रिजवान हे 2011 मध्ये हज यात्रेला गेले होते. तिथे विविध देशातील नागरिक येतात. त्याच ठिकाणी मोमीन रिजवान यांची विविध देशातील नागरिकांशी ओळख झाली. तिथूनच त्यांनी विविध देशातील नागरिकांकडून देशातील नोटा आणि नानी घेत आपला छंद जोपासला. अमेरिका, इंडोनेशिया, इराक, इराण, मेक्सिको अशा देशातील चलनी नोटा आणि त्यांच्या पूर्वजांनी संग्रहित केलेली निजाम कालीन नाणी त्यांच्याकडे संग्रहित आहेत. त्यांनी आपल्या दुकानात ठेवलेल्या नोटा आणि नाणी पाहण्यासाठी बीडकर आवर्जून येतात.

Updated : 17 Jun 2022 4:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top