चित्रपट अभिनेते आणि विद्यमान खासदार क़ॉंग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेला विरोध त्यांच्या पथ्यावर पडला नाही. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांचा दोन लाख ८४ हजार ६५७ मतांनी पराभव केलाय. भाजपावर सातत्यानं टीका करणा-या शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपन उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर ही जागा लढवली होती. मात्र, पाटणा साहिब मतदार संघातील मतदारांनी सिन्हा यांना नाकारलं. शत्रुघ्न सिन्हा यांना तीन लाख २१ हजार ४० मते पडली आहे. एकूण मतांच्या ३२.८७ टक्के मते सिन्हा यांच्या झोळीत पडली आहे. एकूण मतदानांच्या तब्बल ६१.२५ टक्के मते रविशंकर प्रसाद यांना मिळाली आहेत.
Updated : 24 May 2019 6:39 AM GMT
Next Story