Home > मॅक्स रिपोर्ट > पनामानंतर जागतिक आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा 'पँडोरा' उघड; भारतासह जगभरात खळबळ

पनामानंतर जागतिक आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा 'पँडोरा' उघड; भारतासह जगभरात खळबळ

प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, नीरा राडिया, गांधी कुटुंबीयांचे निष्ठावान दिवंगत सतीश शर्मांचा समावेश

पनामानंतर जागतिक आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा पँडोरा उघड; भारतासह जगभरात खळबळ
X

काही वर्षांपुर्वी पनामा पेपर्सनं जगात खळबळ उडवल्यानंतर आता जगभरातील विविध देशातील राजकीय नेते, उद्योजक, सेलिब्रेटी यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा `इंडीयन एक्सप्रेसनं` समोर आणला आहे. भारतीतील ३०० उद्योगपती, राजकारणी आणि सिनेकलाकारसह विविध क्षेत्रांतील नामवंतांचा 'पँडोरा पेपर्स'मध्ये समावेश आहे. या अतीश्रीमंत भारतीयांनी करसवलत किंवा संपूर्ण करमाफी असलेल्या देशांत गुप्तपणे काळे धन लपवल्याचा आरोप आहे. त्यात प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, नीरा राडिया, गांधी कुटुंबीयांचे निष्ठावान दिवंगत सतीश शर्मा आदींचा समावेश आहे.



जगभरातून ११९ कोटी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा 'आर्थिक गैरव्यवहार' जगासमोर उघड झाला आहे. ११७ देशांतील ६०० पत्रकार 'पँडोरा पेपर लीक'च्या तपासात सहभागी होते, असे 'आयसीआयजे'ने स्पष्ट केले आहे.

इंडीयन एक्सप्रेसनं प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार २०१६ साली अवसायनात गेलेल्या ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समधील (बीव्हीआय) एका परदेशी कंपनीचे लाभार्थी मालक (बेनिफिशियल ओनर्स) म्हणून सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबियांची नावांचा पँडोरा पेपर्समध्ये समावेश आहे. पँडोरा पेपर्सचा भाग असलेल्या पनामातील 'अल्कोगाल' या लॉ फर्ममधील तपासाच्या रेकॉर्डमध्ये सचिन, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासरे आनंद मेहता यांची 'बीव्हीआय'मधील सास इंटरनॅशनल लि. या कंपनीचे बीओ व संचालक म्हणून नावं पुढं आली आहेत.



पाच वर्षांपूर्वी 'पनामा पेपर लीकने जगभरात खळबळ उडवली होती. बड्या व्यक्तींनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून केलेली करचुकवेगिरी यामुळे समोर आली होती. आता पुन्हा एकदा 'इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स'ने (आयसीआयजे) 'पँडोरा पेपरलीक'द्वारे आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामध्ये हा गैरव्यवहार कशाप्रकारे करण्यात आला होता आणि हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी यावर कशी सारवासारव केली हे देखील या पेपर्समधे उघड झाले आहे.



या यादीतील ३०० पेक्षा जास्त भारतीय नावांपैकी ६० जणांविरुद्ध पुरावे तपासण्यात आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. येत्या काही दिवसांत हे उघड होतील. या लोकांनी करचुकवेगिरीसाठी सामोआ, बेलीज, कुक बेटांपासून ते ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि पनामापर्यंत आश्रय घेतल्याचे कागदपत्रातून उघड होता आहे. अभिनेता जॅकी श्रॉफ, उद्योगपती किरण मुजुमदार शॉ, नीरव मोदींच्या बहीन पुर्वी मोदी यांच्याही नावांचा समावेश आहे.



उद्योगपती अनिल अंबानी यांनी आपली मालमत्ता शून्य असल्याचे गेल्या वर्षी एका ब्रिटिश न्यायालयात सांगितले होते. प्रत्यक्षात त्यावेळी त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, सायप्रस येथे १८ कंपन्यांमध्ये कोटय़वधी डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

३०० भारतीयांसोबतच पँडोरा पेपरलीकमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळच्या ७०० जणांच्या नावांचा समावेश आहे. यांची मालमत्ता परदेशात शेल कंपन्यांच्या स्वरूपात असल्याचा आरोप आहे.पाकिस्तान सरकारचे अर्थमंत्री शौकत तारिन, जलसंपदा मंत्री मुनिस इलाही, खासदार फैसल वावडा, उद्योग आणि उत्पादन मंत्री खुसरो बख्तियार यांच्या नावाचा समावेश आहे. तर, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नातेवाईक इशाक डार, बिलावट भुट्टो यांच्या पीपीपी पक्षाचे शारर्जिल मेमन यांचीही नावे समोर आली आहेत. त्याशिवाय पाकिस्तानमधील काही निवृत्त लष्करी अधिकारी, व्यावसायिक आणि माध्यम कंपन्यांच्या मालकांच्या नावाचा समावेश आहे.



सचिन तेंडूलकर यांनी या आरोपानंतर तातडीने वकिलामार्फत स्पष्टीकरण दिले आहे. या गोष्टीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. सचिनचे नाव विनाकारण बदनाम केले जात आहे. जगभरात सचिनची प्रतिमा एक स्वच्छ आणि प्रामाणिक क्रिकेटपटू अशी आहे. मैदान आणि मैदानाच्या बाहेर सचिन कोणत्याही वादात नव्हता. क्रिकेटच्या मैदानावर छोटे-मोठे वाद होतच असता. पण क्रिकेटपटू म्हणून सक्रीय असताना तो वादापासून दूर होता. सचिन वादग्रस्त वक्तव्यापासून लांबच राहतो अशी सारवासारव सचिनकडून करण्यात आली आहे.

Updated : 4 Oct 2021 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top