Home > मॅक्स रिपोर्ट > मंत्रालयासमोर श्रमजीवी आदिवासी तरुणींची निदर्शने

मंत्रालयासमोर श्रमजीवी आदिवासी तरुणींची निदर्शने

मंत्रालयासमोर श्रमजीवी आदिवासी तरुणींची निदर्शने
X

कविता करण्याच्या नादात विकृत कवी दिनकर मनवर याने आदिवासी मुलींच्या अगदी उघड्या स्तनांच्या वर्णणापर्यंत आपल्या कल्पनेची मजल गाठली. हीच ‘पाणी असं अस्त’ ही कविता आपल्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कविता संग्रहात प्रकाशित करून आदिवासी माता भगिनींच्या चक्क अब्रूलाच हात घातल्यामुळे या विकृत कवी दिनकर मनवर आणि कविता अभ्यासक्रमात घेणारे अक्कलशुन्य पाठ्यपुस्तक मंडळ सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी श्रमजीवीने 30 सप्टेंबर रोजी मंत्रालया समोर मंत्री निवस्थानाबाहेर निदर्शने करत निषेध नोंदवला. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आंदोलकांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत येत्या सात दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

श्रमजीवी च्या आंदोलनानंतर आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ढाल पुढे करत दिनकर मनवर आणि त्यांच्या समर्थक विचारवंतांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गलचेपीची आवई उठवली आहे. अभिव्यक्ती स्वतंत्र्य हे घटनादत्त असले तरी ते दुसऱ्याच्या उंबरठ्यावर थांबते याचा विसर या प्रतीभावंतांना पडलेला असल्याचे दिसते. आदिवासी संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी दखलपात्र आहेत, आदिवासींची कला, कष्ट आणि परिस्थिती हिचे वर्णन का सूचले नाही बरं कवीला असा प्रश्न संघटनेकडून विचारला जात आहे. पाण्याच्या रंगाची तुलना आदिवासी मुलींच्या रंगासोबत करण्या ऐवजी कष्ट करणाऱ्या आदिवासीच्या घामाशी का बरं तुलना केली नाही कवीने पाण्याची? असे प्रश्न आता आदिवासी युवती विचारताहेत.

हजारो श्रमजीवी तरुणींचे नेतृत्व करत श्रमजीवीच्या युवा कार्यकर्त्या ममता परेड,पूजा सुरुम, स्नेहा घरत, सुरक्षा जाबर, अनिता वाघे,दीपाली भोईर, चैताली गावित, नीता गावंडा,यांच्यासह नलिनी बुजड,संगीता भोमटे,जया पारधी, योगिता दुर्वे या ठाणे,पालघर,नाशिक आणि रायगड येथील रणरागिनींनी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन सादर केले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर,,सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे, जिल्हा युवक प्रमुख प्रमोद पवार, जिल्हा सचिव राजेश चन्ने, दशरथ भालके, प्रकाश भोईर,भगवान मधे, दिनेश पवार, यांच्यासह राज्य, जिल्हा,तालुका पदाधिकारी या आंदोलनात उपस्थित होते.

Updated : 1 Oct 2018 11:39 AM GMT
Next Story
Share it
Top