Home > मॅक्स किसान > कांद्याने केला वांदा... डिसेंबरपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ रहाणार

कांद्याने केला वांदा... डिसेंबरपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ रहाणार

कांद्याने केला वांदा... डिसेंबरपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ रहाणार
X

३ ते ४ महिने ६ ते ७ रुपये प्रतिकिलो असणारा कांदा हा नोव्हेंबर महिन्यात १०० रुपये प्रतीकिलोपर्यंत इतका गेला आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं. काढलेला कांदा सडल्याने बाजारातही कमतरता जाणवू लागल्याने आणि कांद्याचे भाव वाढले आहेत.

या भाववाढीचा फटका हा सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. बाजारामध्ये कांद्याची कमतरता असल्यामुळे बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव वाढतच आहेत. संपूर्ण देशात देखील २-३ महिन्यांपासून अशीच स्थिती आहे. भारत सरकारने कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी याआधीच १ लाख टन कांदा आयात करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यापैकी ६,००० टन कांदा हा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येईल असा अंदाज आहे. मात्र तोपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत.

बोरिवलीला राहणाऱ्या शैला रवींद्र देशमुख यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’ला सांगितलं की, त्या नेहमी वाशी मार्केटमधून भाज्यांची खरेदी करत असतात. काही दिवसांपूर्वी ६-७ रूपये किलो असलेला कांदा आता १०० रुपये किलो झाला आहे. घाऊक बाजारात त्याची किंमत ६० ते ७० रुपये आहे. १० रुपयांचा कांदा १०० रुपयांवर गेला तर कांदा खाणंच सोडून द्यावं लागेल अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.

कांदा हा पाहिल्यासाखा राहिला नाही. कांद्याचे दर वाढल्यामुळे इतर भाज्यांची खरेदी कमी करावी लागते. त्यामुळे आठवड्याचं गणित बिघडल्याचं विशाल राऊत यांनी सांगितलं.

हे ही वाचा…

ठाकरे सरकारने ‘या’ दोन बाबींकडे दुर्लक्ष करता कामा नये – संजीव चांदोरकर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा समन्स

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मी उध्दव ठाकरे शपथ घेतो की….

कांदा-बटाटा व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके म्हणले की, साधारण सप्टेंबर महिन्यात नवीन कांदा बाजारपेठेत येतो. मागच्या मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे हा कांदा खराब झाला. त्यामुळे नवीन कांदा मार्केटमध्ये आलाच नाही. त्यामुळे बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कांद्यावर सगळा ताण आला.आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर जुन्या कांद्याने खुप साथ दिली. राज्यातल्या बाजारात असलेला जास्तीत जास्तीत हा कर्नाटक, मध्यप्रदेश आणि काहीसा अफगाणिस्तानातून येतो. काही दिवसांपूर्वी ग्राहक २-५ किलो कांदा घेत. आता तेच अर्धा आणि पाव किलोवर आले आहेजो कांदा आयात करण्यात येणार आहे तो कांदा बाजारपेठेच्या हिशोबाने पुरेसा नाही. कांद्याची वाहतूक करताना साधारणपणे १ ट्रक कांद्यापैकी १५ ते २० पोती कांदा सडतो. त्यामुळे त्यांची जास्त वाहतूक करणंही नुकसानकारक ठरतं.

राज्यात वेगवेगळ्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्यापैकी कांदा हा सडून गेला आहे तर कांद्याचं जवळजवळ २६% उत्पादन कमी झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

“माझ्याकडच्या १२ एकरपैकी मी ७ एकरवर कांदा लावला होता. त्यासाठी मला जवळपास दीड ते दोन लाखांचा खर्च आला. ७ एकरात मला १ हजार ते १,२०० पोती कांदा होईल अशी आपेक्षा होती मात्र ३०० ते ४०० पोती उत्पादन झालं. अवकाळी पावसाची नुकसानभरपाई म्हणून शासनाने जाहीर केलेले ८ हजार रुपयांनी काय होणार” असा सवाल संगमनेरचे शेतकरी प्रशांत घुले यांनी केलाय.

Updated : 29 Nov 2019 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top