Home > मॅक्स रिपोर्ट > न्यायासाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंचा आक्रोश, सरकारचा मात्र कानावर हात

न्यायासाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंचा आक्रोश, सरकारचा मात्र कानावर हात

ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी ब्रिज भुषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनाला महिना पूर्ण झाल्यानंतरही सरकारने अजूनही या कुस्तीपटूंची दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे. पण महिनाभरात नेमकं काय घडलं? याचा वेध घेऊयात भरत मोहळकर यांच्या स्पेशल रिपोर्टमधून...

न्यायासाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंचा आक्रोश, सरकारचा मात्र कानावर हात
X

जानेवारी 2023 मध्ये विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भुषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी कुस्तीपटूंची भेट घेत 5 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली होती. मात्र तीन महिन्यानंतरही अहवाल न आल्याने पुन्हा कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. त्यातच 23 एप्रिलपासून या कुस्तीपटूंनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. त्याला एक महिना पुर्ण झाला. मात्र अजूनही सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

आतापर्यंत काय घडलं?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभुषण सिंह यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप या महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यामुळे न्यायाची मागणी करत महिला कुस्तीपटूंनी 2023 च्या सुरुवातीलाच आंदोलन केलं होतं. त्यावेळी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंची भेट घेत आरोपांसंदर्भात 5 सदस्यांच्या समितीची स्थापना केली होती. त्यासाठी आधी चार आणि त्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण तीन महिन्यांनंतरही समितीने काय तपास केला? पण या तपासात नेमकं काय आहे? याची कुठलीच माहिती समोर आली नाही. त्यामुळे कुस्तीपटूंनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसलं. जागतिक पातळीवर भारताचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंनी 23 एप्रिल रोजी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु केला.

21 एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली पण पोलिसांनी एफआयआरसुध्दा दाखल करून घेतला नाही.

23 एप्रिल रोजी जंतर-मंतर मैदानावर खेळाडूंनी आंदोलनास सुरुवात

24 एप्रिल रोजी पालम 360 खापचे प्रधान चौधरी सुरेंद्र सोलंकी यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली.

25 एप्रिल- कुस्तीपटूंनी ब्रिजभुषण सिंह यांच्याविरोधात FIR दाखल व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यावरून सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

26 एप्रिल - सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी कुस्तीपटूंची भेट घेत पाठींबा दर्शवला

27 एप्रिल - ब्रिजभुषण सिंह यांनी कवितेच्या माध्यमातून दिलं आरोपांना उत्तर

ऑलिम्पिक विजेते नीरज चोप्रा (Neeraj Chopra), अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra), टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza), क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग(virender sehwag), इरफान पठाण (Irfan Pathan), कपिल देव (Kapil Dev) यांचा कुस्तीपटूंना पाठींबा

दिल्ली पोलिसांनी ब्रिजभुषण सिंह विरोधात दोन FIR केले दाखल

कुस्तीपटूंच्या आंदोलनस्थळी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडीत केल्याचा केला आरोप

आंदोलनस्थळी पाणी पोहचू नये म्हणून कारवाई केल्याचा कुस्तीपटूंचा आरोप

29 एप्रिल- प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आंदोलनस्थळी कुस्तीपटूंची भेट घेत सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला.

3 मे - जंतरमंतरवर कुस्तीपटूंना पोलिसांची धक्काबुक्की, पोलिस कारवाईत कुस्तीपटू जखमी

7 मे- कुस्तीपटूंचा कँडल मार्च

8 मे- शेतकऱ्यांचा कुस्तीपटूंना पाठींबा

11 मे- कुस्तीपटूंनी ब्लॅक रिबन बांधून ब्लॅक डे केला साजरा. अल्पवयीन मुलींनी न्यायदंडाधिकाऱ्यांस जबाब नोंदवला.

20 मे- कुस्तीपटूंना अरुण जेटली (arun jaitley) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रवेश नाकारल्याचा आरोप

21 मे- हरियाणातील खाप पंचायतीत ब्रिज भुषण सिंह यांच्या नार्को टेस्टची (Narco Test) मागणी

यानंतर 22 मे रोजी कुस्तीपटूंनी ब्रिजभुषण सिंह यांची लाईव्ह नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. एवढंच नाही तर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया (Bajarang Punia) यांचीही चाचणी करण्याची मागणी कुस्तीपटूंनी केलीय.

ब्रिजभुषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र ब्रिजभुषण सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. माझी चूक आढळली तर मला फासावर लटकवा, असंही ब्रिजभुषण सिंह यांनी म्हटलं आहे. मात्र पदक जिंकून आल्यानंतर कुस्तीपटूंचं कौतूक करणारे पंतप्रधान मोदी कुस्तीपटूंच्या मागणीवर गप्प का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Updated : 23 May 2023 11:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top