Home > Election 2020 > साध्वी प्रज्ञासिंहला निवडणूक आयोगाची नोटीस

साध्वी प्रज्ञासिंहला निवडणूक आयोगाची नोटीस

साध्वी प्रज्ञासिंहला निवडणूक आयोगाची नोटीस
X

मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भोपाळच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना नोटीस बजावली आहे. साध्वीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात तिच्याविरोधात टीकेची झोड उठल्यानंतर तिने दिलगिरी व्यक्त केली होती. तर साध्वीचे मत हे तिचे वैयक्तिक असल्याचे सांगत भाजपानेही हात वर केले होते. या प्रकऱणी आता साध्वी प्रज्ञासिंह हिने देशाचे रक्षण करणा-या पोलीस अधिका-याचा अवमान केल्याचे सांगत निवडणूक कार्यालयाने यासंदर्भात एका दिवसांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस साध्वी प्रज्ञासिंह हिला बजावली आहे.

२००८ च्य़ा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भारतीय जनता पक्षातर्फे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांनी २००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागलेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी नुकतेच वादग्रस्त विधान केले आहे.

हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले असून त्यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवले होते. त्यांना याची शिक्षा मिळाली. दहशतवाद्यांनी करकरे यांना मारुन माझे सुतक संपवले असल्याचे अतिशय बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केले होते. हेमंत करकरे यांनी माझ्यासोबत चूकीचा व्यवहार केला आणि मला याप्रकरणात अडकवल्याचा आरोप करीत करकरे हे देशद्रोही, कुटिल आणि धर्मविरोधी होते असे वादग्रस्त विधानही साध्वींने केले होते. यासंदर्भातील वक्तव्याबाबत त्यांना आता निवडणूक आयोगाला 24 तासांत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

Updated : 20 April 2019 10:45 AM GMT
Next Story
Share it
Top