Top
Home > News Update > बीएमसीच्या केईएम रुग्णालयात एका बेडवर तीन - तीन रुग्णांवर उपचार !

बीएमसीच्या केईएम रुग्णालयात एका बेडवर तीन - तीन रुग्णांवर उपचार !

बीएमसीच्या केईएम रुग्णालयात एका बेडवर तीन - तीन रुग्णांवर उपचार !
X

मुंबईमध्ये वितभर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी देशातून लोक येतात. मिळेल त्या जागेत जीवन जगत असतात. मात्र, जर कोणी आजारी पडलं तर या महागड्या जगात उपचार घेणं शक्य होत का? तर निश्चितच नाही. त्यातच या हातावर पोट असणाऱ्या सर्व लोकांना सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं हे सर्व लोक सरकारी दवाखान्यात जातात.

मुंबईत महानगरपालिका आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम करते. आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधेची माहिती घेण्यासाठी महानगरपालिकेच्या केईम हॉस्पिटला भेट दिली. तर काही धक्कादाय वास्तव समोर आमच्या समोर आलं.केईएम रुग्णालयात पुरेसे बेड नसल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रुग्णांना बेड नसल्यानं दोन बेड एकमेकांना जोडून त्यावर तीन –तीन, चार - चार पेशंट वर उपचार केला जातो मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या नाझ शेख या पेशंट म्हणाल्या की, मला 5 ते 6 दिवसांपूर्वी इथं दाखल करण्यात आलंय. त्या दिवसापासुन दोन-दोन बेडवर तीन – तीन, चार-चार पेशंट वर उपचार केला जातो.

हे ही वाचा...

या संदर्भात आम्ही रुग्णालयाच्या काही रुग्णांशी बातचित केली असता त्यांनी दोन बेड वर तीन काय?... तर चार पेशंट वर देखील उपचार केला जात असल्याची धक्कादायक माहिती आम्हाला दिली.विशेष बाब म्हणजे ज्य़ा महिला रुग्णांचं सिजर झालं आहे. त्या रुग्णांवर देखील एका पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येतो. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्य़ाची भीती असते.रुग्णांची वाढती संख्या आणि सरकारी हॉस्पिटलवरचा वाढत भार, डॉक्टरांची कमी आणि सरकारच असणारं दुर्लक्ष अशी वेगवेगळी कारण यासाठी कारणीभूत आहेत.

या वर्षीच महानगरपालिकेने सरकारी रुग्णालयांवरील कर्च 15 टक्क्यांनी वाढवला आहे. तरी देखील रुग्णांची काळजी करण्यापेक्षा आता जास्त काळजी या रुग्णालयांची करण्याची वेळ आली आहे. रुग्णांच्या भौतिक गरजा हॉस्पिटलमध्ये कठोर आणि अभद्र वर्तवणूक देणारा स्टाफ अशा अनेक तक्रारी रुग्णांनी आमच्याशी बोलताना सांगितल्या.

केईम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितलं की, ‘वन बेड वन पोलिसी आहे. तरी देखील आम्हाला रुग्णांचा उपचार करताना नाही म्हणता येत नाही. डॉक्टर चं प्रमाण अन रुग्णाचं प्रमाण यामध्ये खूप तफावत आहे. डॉक्टरचं प्रमाण हे रुगणांच्या तुलनेत खूप कमी आहे. तसेच बेडच प्रमाण आणी रुगांनाच यामध्ये खूप तफावत आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे बेड हे अपुरे पडत आहेत.

एकीकडे देश जागतिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे. तर दुसरीकडे आपण अद्यापपर्यंत आपल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकलेलो नाही. त्यामुळं देशातील काही लोकच या जागतिक महासत्तेचे लाभार्थी होतील. आणि भारत आणि इंडिया अशी दरी वाढत जाईल. गरीब भारतातील लोक श्रीमंत इंडियाकडे पाहत. देश जागतिक महासत्ता झाल्याचा आनंद रिकाम्य़ा पोटाने साजरा करतील.

Updated : 12 Dec 2019 4:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top