मोदींच्या सभेत आता पाण्याच्या बाटल्यांवर बंदी!
Max Maharashtra | 22 April 2019 10:01 AM IST
X
X
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेच्या रोषाची प्रचंड भीती असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पंतप्रधान आज नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे सभा घेणार आहेत. मात्र, या सभेला जर तुम्ही जाणार असाल तर भरपूर पाणी पिऊन जा... कारण मोदींच्या सभेत भर उन्हात जर तुम्हाला तहाण लागली तर तुम्ही तुमच्या घरुन पाण्याची बाटली घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यामुळे भरपूर पाणी पिऊनच मोदींच्या सभेला जा. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? नवीन वैगरे काही नाही तर, मोदींना निषेधाची भीती वाटते. हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको. त्यामुळे आता काळ्या रंगाच्या कपडे आणि वस्तू बरोबरच मोदींच्या सभेला आता पाण्याच्या बाटल्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता मोदींच्या सभेत लोकांना रणरणत्या उन्हात पाण्यावाचून राहावं लागणार आहे. सभेला नाशिक ग्रामीण व शहरासह धुळे, नगर, जळगाव यासह अन्य जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार पोलिसांचा सभास्थळी आणि मार्गावर चोख बंदोबस्त आहे.
त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून राज्यात काही जिल्ह्यामध्ये तापमान 40 अंशाचे वर गेले आहे. त्यातच अशा प्रकारे पाणी बंदी केल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
सभा स्थळाच्या भोवती 6 फुटाचा चर...
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मोदी सरकारच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोदी सरकारवर प्रचंड नाराज आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात युपीए सरकारच्या काळात युपीएच्या मंत्र्यांला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोर जावं लागलं होतं. त्यामुळे मोदींच्या सभास्थळी 6 फुटाचा चर खोदण्यात आला आहे. या चरामुळे सभास्थळापर्यंत पोहोचणे त्रासदायक होणार आहे.
मोदींच्या य़ा अगोदरच्या सभांमध्ये काळ्या रंगाचे बनियन असलेल्या व्यक्तींना प्रवेश नाकारला होता. आता या सभेत पाण्यांच्या बाटल्य़ाबरोबरच हॅन्डबॅग वस्तूंवर बंदी घालण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याच देशातील जनतेची भीती का वाटते असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Updated : 22 April 2019 10:01 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire