लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साधारणतः दहा उमेदवारांना पराभवापासून वंचित ठेवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये पुन्हा विधानसभेसाठी आघाडी होईल की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, अशा परिस्थितीत काँग्रेससाठी वंचित आघाडीनं समाधानाकारक भूमिका घेतलीय.
पुणे जिल्हा परिषदेच्या बावडा-लाखेवाडी या गटासाठी पोटनिवडणूक होतेय. रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होतेय. त्यासाठी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता या काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच अंकिता यांना पाठिंबा दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील बावडा इथं आज वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली. ही निवडणूक उत्साहाची नसून रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी होत आहे. त्यामुळं भावनिक असलेल्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अशी माहिती वंचितचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरत चितारे यांनी दिलीय.
Updated : 8 Jun 2019 2:30 PM GMT
Next Story