Home > मॅक्स रिपोर्ट > भाजप सत्तेत येताच डॉ हेडगेवार नगर गावाची निर्मिती

भाजप सत्तेत येताच डॉ हेडगेवार नगर गावाची निर्मिती

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात डॉ. हेडगेवार यांच्या नावाने गावाची निर्मीती करण्यात आली आहे. याबाबतचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

भाजप सत्तेत येताच डॉ हेडगेवार नगर गावाची निर्मिती
X

राज्यात महाविकास आघाडी सरकार म्हणजेच ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर हिंदुत्वाचा नारा देत शिंदे गटांन भाजप बरोबर युतीचे सरकार आणले. या सरकारने धडाक्यात निर्णय घेत आपल्या कामांची सुरूवात केली. दुसऱ्याच कॅबिनेट बैठकीमध्ये शिंदे – फडणवीस सरकारने डॉ. हेडगेवारनगर या नव्या महसुली गावाची निर्मिती केली आहे. 18 तारखेला झालेल्या दुसऱ्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याच आले. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशिव नामांतर झाले.

त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक असलेले डॉ. केशव हेडगेवार यांच्या नावाने जळगाव जिल्ह्यातील धरणगाव जवळील नव्याने अस्तित्वात आलेल्या गावाला महसुली दर्जा देण्याच आला आहे. गावकऱ्यांनीच डॉ. हेडगेवार नगर असे नाव द्यावे यासाठी सरकारकडे मागणी केली होती.

या निर्णयाला २०१९मध्ये फडणवीस सरकारने मान्यता दिली होती, पण राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर याबाबतचा आदेश निघाला नव्हता, तो आदेश आता निघाला आहे अशी माहिती या गावातील लोकांनी दिली आहे.

Updated : 2022-07-23T11:40:28+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top