Home > Election 2020 > व्हिडीओ : दहशतवाद त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक – भाजप प्रदेशाध्यक्षाची जीभ घसरली

व्हिडीओ : दहशतवाद त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक – भाजप प्रदेशाध्यक्षाची जीभ घसरली

व्हिडीओ : दहशतवाद त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक – भाजप प्रदेशाध्यक्षाची जीभ घसरली
X

लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election) प्रचारात महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांचा उल्लेख दहशतवादी असा केल्यानंतर मध्यप्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी एका सभेत भाषण देताना दहशतवादाला त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं वादग्रस्त विधान केलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून विरोधी पक्षावर टीका करताना त्यांची जीभ चांगलीच घसरली आणि त्यांनी दहशतवादाला त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटलं आहे. न्यूज एजेन्सी एएनआईने हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

Updated : 25 April 2019 3:17 AM GMT
Next Story
Share it
Top