News Update
Home > Election 2020 > आपणच पाडलं आपलं हेलिकॉप्टर, निवडणुका संपताच रिपोर्ट बाहेर

आपणच पाडलं आपलं हेलिकॉप्टर, निवडणुका संपताच रिपोर्ट बाहेर

आपणच पाडलं आपलं हेलिकॉप्टर, निवडणुका संपताच रिपोर्ट बाहेर
X

पुलवामा हल्लाचा बदला घेण्यासाठी बालाकोट हवाई हल्ला केल्यानंतर भारतीय हवाई हद्दीत तणावाचं वातावरण होतं. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांशी सामना करत असताना आपल्या एका जवानाला पाकिस्तानने अटक केली होती, तर त्याच दरम्यान आपलं एक हेलिकॉप्टर पडून सहा जवान शहीद झाले होते. या सहा जवानांमध्ये नाशिकच्या स्क्वार्ड्रन प्रमुख निनाद यांचा समावेश होता. निवडणुका संपताच आता या हवाई कारवाई मागचं एक मोठं सत्य बाहेर आलंय, बडगाम इथे पडलेलं हेलिकॉप्टर अपघातामुळे पडलेलं नसून भारतीय क्षेपणास्त्रामुळेच पडल्याचं चौकशीत समोर आलं आहे. निवडणुका होई पर्यंत हा रिपोर्ट दाबण्यात आल्याने आता वाद उफाळून आला आहे.

भारतीय हवाई दलाचं हेलिकॉप्टर चुकून शत्रूराष्ट्राचं हेलिकॉप्टर वाटल्याने भारतीय सैन्याने क्षेपणास्त्राच्या साह्याने पाडल्याचं समोर आलं आहे. हेलिकॉप्टर पाडणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सैन्यातर्फे सांगण्यात आलंय.

Updated : 22 May 2019 7:03 AM GMT
Next Story
Share it
Top