राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्विट केले असून 'मै झूठ का साथ निभाता चला गया.. हर रोज मै 'फूल' बनाता चला गया !' हे ट्विट करत मोदींवर निशाणा साधला असून या सोबत ट्विट सोबत एक व्यंगचित्र जोडले आहे. या व्यंगचित्रात कॅलेंडरवर 1 एप्रिल फूल डे असे दाखवण्यात आले आहे.'
मै झूठ का साथ निभाता चला गया..हर रोज मै 'फूल' बनाता चला गया ! #AprilFools #FekuDiwas #ModiMatBanao #LokSabhaElections2019 pic.twitter.com/cPXFJ3bEzK
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 1, 2019
आज 1 एप्रिल अर्थात (फूल दिवस) आहे. आज विरोधकांसह सत्ताधारी भाजपने देखील एकमेकांवर टीका करण्यासाठी एप्रिल फूल डेचा वापर केला. वर्धा येथे मुख्यमंत्र्यांनी ‘एप्रिल फूल डे’ चा वापर करत विरोधकांवर निशाणा साधताना ‘काही देशांमध्ये आज एप्रिल फूल दिवस साजरा केला जातो, मात्र गेली 50 वर्ष काँग्रेसने देशाला एप्रिल फूल बनवलं आहे, आता लोकांना तुम्ही एप्रिल फूल बनवू शकत नाही अशी खिल्ली मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची उडवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल करत मोदींवर निशाणा साधला आहे.
Updated : 1 April 2019 4:49 PM GMT
Next Story