Home > Election 2020 > पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरेंची हजेरी

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरेंची हजेरी

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरेंची हजेरी
X

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एनडीएतील एकी दाखवण्यासाठी सर्व एनडीएतील घटक पक्षांना आमंत्रण दिलं आहे. त्यामुळं आज वाराणसीत एनडीएची सर्व प्रमुख नेते वाराणसीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार असून 2014 ला मोदींना विरोध करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मोदींसोबत उपस्थित राहणार आहेत. तसंच एनडीएतील विश्वासू घटक पक्ष शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादलदेखील वाराणसीत दाखल होणार आहेत.

भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री राहणार उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. भाजपतील अनेक बडे नेतेदेखील पंतप्रधान मोदींसोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर राहणार असल्याचं भाजपनं म्हटलंय.

Updated : 26 April 2019 4:04 AM GMT
Next Story
Share it
Top