Home > Election 2020 > EVM आणि VVPAT संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

EVM आणि VVPAT संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

EVM आणि VVPAT संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
X

गेल्या काही दिवसांपासून EVM आणि व्हिव्हिपॅट संदर्भात विरोधकांसह सर्वसामान्य नागरिक देखील शंका उपस्थित करत आहे. त्यातच विरोधकांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव व्हिव्हिपॅट आणि ईव्हिएमची एकत्रित मोजणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

EVM आणि व्हिव्हिपॅट संदर्भात कॉंग्रेससह 21 विरोधी पक्षांनी याचिका दाखल केली असून या याचिकेत 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

तर काय होईल...

दरम्यान, विरोधकांनी ही मागणी मान्य केल्यास लोकसभा निवडणुकीचे निकाल 2 ते 3 दिवस उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण, 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्यासाठी वेळ लागू शकतो.

Updated : 7 May 2019 5:44 AM GMT
Next Story
Share it
Top