Top
Home > मॅक्स रिपोर्ट > नाणार रायगडमध्ये स्थलांतरित होणार, मुख्यमंत्र्यांचं लेखी उत्तर

नाणार रायगडमध्ये स्थलांतरित होणार, मुख्यमंत्र्यांचं लेखी उत्तर

नाणार रायगडमध्ये स्थलांतरित होणार, मुख्यमंत्र्यांचं लेखी उत्तर
X

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात देत ही माहिती दिली.

सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु शिवसेनेने नाणारला विरोध केला. तसेच भाजपबरोबर युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली होती.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याचंही मुख्यंत्र्यांनी म्हटलं आहे. ४० गावांतील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.

Updated : 19 Jun 2019 8:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top