Home > मॅक्स रिपोर्ट > GroundReprot : नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श 'ऑक्सिजन पॅटर्न'

GroundReprot : नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श 'ऑक्सिजन पॅटर्न'

राज्यासह संपूर्ण देशात ऑक्सिजन आणीबाणी आहे. पण यावर नंदुरबार जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन आत्मनिर्भरतेचा उपाय शोधून काढला आहे. पाहा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

GroundReprot : नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श ऑक्सिजन पॅटर्न
X

राज्यात सर्वत्र ऑक्सिजन आणीबाणी सुरू आहे. मात्र नंदुरबार जिल्हा प्रशासनाने रुग्णालयासह जिल्ह्यातील तीन ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे पाच प्लांट तयार करत ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. यामुळे अतिरिक्त ऑक्सिजन निर्मिती होत असून नंदुरबार जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलाय.

राज्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आसल्याने ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. ऑक्सिजन मिळवण्यासाठी मोठी कसरत रुग्णालय प्रशासनाला करावी लागत आहे. मात्र यावर उपाय म्हणून नंदुरबार जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात हवेपासून ऑक्सिजन तयार करणारे दोन प्लांट तयार केलें आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रॉ मटेरियलची गरज नसून हवेतून ऑक्सिजन घेऊन या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केली जात आहे.

जिल्हा रुग्णालयाला दररोज 400 जंबो सिलेंडर ऑक्सिजनची गरज पडते. हे दोन्ही प्लांट सुरू झाल्यापासून ती गरज अवघ्या दीडशे सिलेंडरवर येऊन ठेपली आहे. स्वतः ऑक्सिजन निर्मिती होत असल्याने ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा रुग्णालय स्वयंपूर्ण झाले आहे.

जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज ओळखून प्रशासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समिती आणि कंपन्यांचा सामजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात नंदुरबारस शहादा, तळोदा आणि नवापूर या ठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची ऑक्सिजन गरज हवेतून ऑक्सिजन तयार करून भगवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे, अशी माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.

ऑक्सिजन नर्स

एका एका सेकंदासाठी ऑक्सिजनची किंमत काय असते हे ऑक्सिजनवर असणाऱ्या रुणांना तसेच त्यांच्या नातेवाईकांनाच माहिती आहे. यामुळे ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून 'ऑक्सिजन नर्स' ची नेमणूक करण्यात आली आहे. यात 50 रुग्णांमागे एक ऑक्सिजन नर्स नेमण्यात आली आहे. यात ऑक्सिजन नर्स ऑक्सिजन बचत करण्यावर लक्ष ठेवतात.

लोकांचे जीव वाचवायचे असतील तर ऑक्सिजन वाचवा

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन चा प्रचंड तुडवडा जाणवला ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांनाचा मृत्यू झाला. पहिल्या लाटेत ऑक्सिजन ची एवढी गरज जाणवली नाही.कोरोनांच्या पहिल्या लाटेतच राज्य सरकारांनी अंक प्रशासनाने ऑक्सिजन निर्मिती ची तयारी करायला हवी होती मात्र तसं कोणत्याच राज्यात ऑक्सिजन निर्मिती वर भर दिला नाही, यामुळे दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव गमवावे लागले. ऑक्सिजन अभावी डोळ्या देखत आपल्या परिवारातील लोकांना आपले जीव गमवावा लागला..


नंदुरबार जिल्ह्यात केंद्र आणि राज्यसरकार च्या मदतीने हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे तीन प्रकल्पाद्वारे प्लांट सुरू केले या प्लांट मधून ऑक्सिजन निर्मिती केली पण त्याच बरोबर ऑक्सिजन कसा बचत करावा यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासनाने नर्सेसना ट्रेनिंग दिली. एक एक सेकंदाचा ऑक्सिजन कसा वाचवावा यावर भर देण्यात आला. ऑक्सिजन वरील एखादा रुग्णाला जेवतांना किंवा बाथरूम मध्ये जातांना तितका वेळ लागतो, त्या मधल्या वेळेस काही मिनिटे ऑक्सिजन चालूच राहतो व ऑक्सिजन वाया जातो , हाच ऑक्सिजन वाचवण्यासाठी कोविड सेंटर मधील प्रत्येक 50 रुग्णांमध्ये एक 'ऑक्सिजन नर्स' म्हणून नेमण्यात आली, ह्या ऑक्सिजन नर्स च काम हेच होत की रुग्णांची ऑक्सिजन लेवल सातत्याने चेक करणे वाया जाणारा ऑक्सिजन बचत करणे एवढं काम करत यामुळे प्रत्येक रुग्णांनाचा काही मिनिटे वाचलेला ऑक्सिजन ची बचत होत राहिली आणि ऑक्सिजन सर्व रुग्णांना वेळेवर हवा तेवढा मिळत राहिला. त्याचा फायदा इतर रुग्णांना ही मिळाला यामुळे नंदुरबार मधील ऑक्सिजन नर्स ही संकल्पना यशस्वी झाली .देशात आणि राज्यात ऑक्सिजनची आणीबाणी असतांना नंदुरबार मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व वापर योग्य प्रकारे होत होता. हीच योजना राज्यातही राबविली.

ऑक्सिजन बचतीची करण्याची विशेष ट्रेनिंग-

कोरोनांच्या पहिल्या लाटेत रुग्ण संख्या तसच मृत्युदर कमी असलेल्या आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने मात्र सर्व रेकॉर्ड तोडले.अनेक रुग्णांचा वेळेवर उपचार तसच ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. ह्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीवर प्रशासनाने भर देत पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प जिल्हा रुग्णालय येथ तयार करण्यात आला.नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय तसच कोविड सेंटर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोये सांगतात की ऑक्सिजन तर आहे. मात्र, त्याची आणखीन गरज पडू शकते यासाठी वाया जाणारा ऑक्सिजनची ही बचत करणे गरजेचे आहे.

यासाठी आम्ही ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबवली. यात प्रत्येकी 50 रुग्णामागे एक नर्स लक्ष ठेवेल त्यासाठी प्रत्येक नर्स ला ऑक्सिजन च गांभीर्य समजून सांगितलं, आपल्या सेवेचं महत्त्व सांगितलं. आपण स्वतः योग्य काळजी घेऊन ऑक्सिजन बचत करण्यावर भर दिली तर बचत केलेले ऑक्सिजन इतर गरजू रुग्णांना मिळू शकत.हे पटवून दिल्यावर सर्वच परिचरिकांनी ही सामाजिक भान ठेवून ऑक्सिजन बचत केली. त्याचा फायदा इतर रुग्णांनाही झाला. इतर जिल्ह्यात ऑक्सिजन साठी इतर राज्यातील येणाऱ्या ऑक्सिजन वर अवलंबून राहावं लागतं होत . मात्र नंदुरबार मध्ये तशी परिस्थिती राहिली नव्हती ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी केलेले प्रयत्न कामाला आले याच समाधान आहे. अस डॉ भोये यांनी सांगितलं.ह्यामुळे त्याचा फायदा बाधित असलेल्या रुग्णांना झाला .

नंदुरबार कोविड सेंटर ला काम करणाऱ्या सीमा वळवी ह्या गेल्या काही वर्षांपासून परिचारिका म्हूणून जिल्हा रुग्णालयात काम करतात. त्यांनी सांगितलं की कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन संपल्याने अनेक रुग्णांनाचा जीव गेला पहिल्या लाटेत ही परिस्थिती नव्हती, ऑक्सिजन च महत्व दुसऱ्या लाटेत सर्वांना कळलं. माणसाचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन किती महत्वाचा आहे, याचंच भान ठेवून आम्ही सर्व परिचारिका ऑक्सिजन नर्स म्हणून ऑक्सिजन बचत करण्यावर भर दिला. एक एक सेकंद ऑक्सिजन वाचवून , इतरांना बचत झालेल्या ऑक्सिजन चा पुरवठा केला जायचा त्याचा चांगला परिमाण दिसला आपल्या मूळ रुग्णांचे जीव वाचताहेत हेच आम्हाला समाधान करणारा आहे.

अनेक अडचणीतून कोरोना नियंत्रणात: जिल्हाधिकारी

नंदुरबार जिल्ह्यात अगोरपासूनच अनेक समस्या आहेत, आरोग्य विभागाच्या 40 टक्के डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. फक्त 60 टक्क्यांवर आरोग्य यंत्रणा काम करतेय, त्यातच कोरोना आणि त्याची दुसरी लाट मुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली होती, मात्र, ज्या परिस्थितीत डॉक्टर नर्स कर्मचाऱ्यांनी कोरोना लाटेतही योग्य मार्ग काढून नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. खासकरून दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन ची प्रचंड तुटवडा होता. मात्र, नंदुरबार जिल्हा प्रशासनाने रुग्णालयासह जिल्ह्यातील तीन ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे पाच प्लांट तयार करत ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. यामुळे अतिरिक्त ऑक्सिजन निर्मिती होत असून नंदुरबार जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत काही प्रमाणात स्वयंपूर्ण बनलाय.

राज्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आसल्याने ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. ऑक्सिजन मिळवण्यासाठी मोठी कसरत रुग्णालय प्रशासनाला करावी लागत आहे. मात्र, यावर उपाय म्हणून नंदुरबार जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात हवेपासून ऑक्सिजन तयार करणारे दोन प्लांट तयार केले आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रॉ मटेरियलची गरज नसून हवेतून ऑक्सिजन घेऊन या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केली जात आहे.

जिल्हा रुग्णालयाला दररोज 400 जंबो सिलेंडर ऑक्सिजनची गरज पडते. हे दोन्ही प्लांट सुरू झाल्यापासून ती गरज अवघ्या दीडशे सिलेंडरवर येऊन ठेपली आहे. ती अजून वाढेल. स्वतः ऑक्सिजन निर्मिती होत असल्याने ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा रुग्णालय स्वयंपूर्ण झाले आहे.
जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज ओळखून प्रशासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समिती आणि कंपन्यांचा सामजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात नंदुरबार शहादा, तळोदा आणि नवापूर या ठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची ऑक्सिजन गरज हवेतून ऑक्सिजन तयार करून भगवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. असं नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी सांगितलं.

नंदुरबार ऑक्सिजन पॅटर्नची दखल

नंदुरबार च्या ऑक्सिजन नर्स आणि ऑक्सिजन पॅटर्नची दखल राज्य सरकाने ही घेतली. देशात आणि राज्यात ऑक्सिजनची आणीबाणी असताना नंदुरबारमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व वापर योग्य प्रकारे होत होता. हिच योजना राज्यातही राबविली जावी असा आग्रह राज्यातील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्वच कोविड सेंटर मध्ये अंमलात आणावी अशी सूचना केली आहे.

राज्यात ऑक्सिजन आणीबाणी आहे. रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला कसरत करावी लागत आहे. मात्र, प्रत्येक सरकारी रुग्णालयात नंदुरबार जिल्हा रुग्णालयासारखे ऑक्सिजन प्लांट तयार करून स्वयंपूर्ण झाले तर ऑक्सिजन वाया जाणार नाही. ऑक्सिजनचे नियोजन करण्यात आले तर ऑक्सिजनची कमतरता भविष्यात जाणवणार नाही. आणि भविष्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होणार नाही.

Updated : 2021-05-31T21:39:15+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top