Home > मॅक्स रिपोर्ट > नगरकरांनी भाजपला नाकारलं, नगरमध्ये त्रिशंकू

नगरकरांनी भाजपला नाकारलं, नगरमध्ये त्रिशंकू

नगरकरांनी भाजपला नाकारलं, नगरमध्ये त्रिशंकू
X

राज्यात अहमदनगर महापालिका आणि धुळे महापालिका निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस या कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे अहमदनगरमध्ये शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी भाजपशी युती करावी लागणार आहे. नगर महापालिकेच्या ६८ जागांपैकी शिवसेनेला २४ जागा मिळाल्यानं आता चौथ्यांदा महापालिकेत सेनेचाच महापौर होणार असल्याची शक्यता अधिक आहे.

अहमदनगरमध्ये भाजपने अनेक मंत्र्यांच्या सभा घेऊन जोरदार प्रचार केला होता. मात्र, जनतेने भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे नेतृत्व नाकारत त्यांचा मुलगा सुवेंद्र गांधी आणि त्यांची पत्नी दिप्ती गांधी यांना पराभूत केलं आहे.

पक्षीय बलाबल -2018

शिवसेना- 24

राष्ट्रवादी-18

भाजपा - 14

काँग्रेस -05

बसपा - 04

अपक्ष-02

समाजवादी - 01

Updated : 10 Dec 2018 11:57 AM GMT
Next Story
Share it
Top