Top
Home > मॅक्स रिपोर्ट >  MY NAME IS RAGA च्या टीझरमधली ‘ती मुलगी कोण?

 MY NAME IS RAGA च्या टीझरमधली ‘ती' मुलगी कोण?

२०१९ लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी राजकीय चित्रपटांची ( बायोपिक) जणू स्पर्धांचं सुरु आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनावर आधारित “ठाकरे” माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ प्रदर्शित झाल्यानंतर या स्पर्धेत सध्याचे पंतप्रधान मागे कसे राहतील त्यामुळे काही दिवसातच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची घोषणा झाली. यानंतर आता या स्पर्धेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी सुद्धा प्रवेश केला आहे आता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जात असून या चित्रपटाचे नाव ‘माय नेम इज रा गा’ असे आहे.या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर शुक्रवारी रिलीज करण्यात आला.

काय आहे या टिझर मध्ये ?

- या चित्रपटात राहुल गांधींच्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या जीवनप्रवास दाखवला आहे . सोबतच या चित्रपटात इंदिरा गांधीजींच्या हत्येपासून ते आतापर्यंतचा काळ दाखविण्यात आला आहे. इंदिरा गांधीजींच्या हत्येचा राहुल गांधीना कसा मानसिक त्रास झाला. वडील राजीव गांधी आणि राहुल गांधी यांचे संबंध कसे होते. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनांमध्ये किती अशालता आहे हे सांगणं कठीण आहे. चित्रपटात मनमोहन सिंग सोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शाह याना सुद्धा दाखवले आहे. पण मजेची गोष्ट म्हणजे अजून अविवाहित असलेल्या राहुल गांधींची प्रियेसी सुद्धा दाखवली आहे .

https://youtu.be/2VRa2mDRXB8

Updated : 9 Feb 2019 3:10 PM GMT
Next Story
Share it
Top