Home > Fact Check > Fact Check : अलिगढमध्ये चिमुरडीचा मृत्यू, सोशल मीडियावर होणारे ‘हे’ दावे खरे आहेत का?

Fact Check : अलिगढमध्ये चिमुरडीचा मृत्यू, सोशल मीडियावर होणारे ‘हे’ दावे खरे आहेत का?

Fact Check : अलिगढमध्ये चिमुरडीचा मृत्यू, सोशल मीडियावर होणारे ‘हे’ दावे खरे आहेत का?
X

सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील अलिगढमधील 2 वर्ष सहा महिन्याच्या ट्विंकल शर्मा नावाच्या मुलीच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला जात आहे. #JusticeForTwinkleSharma या हॅशटॅग खाली लोक व्यक्त होत आहेत. यामध्ये बॉलिवूडच्या कलाकारांसह नेटिझन्सचा देखील समावेश आहे.

काही लोकांचा यावर देखील राग आहे की, इतर प्रकरणावर व्यक्त होणारे लोक सोशल मीडियावर व्यक्त होत नाही. तर काही लोकांच असं देखील मत आहे. की, या मुलीचा रेप करण्यात आला. तसंच तिचे डोळे काढून तिच्या अंगावर असिड चा वापर करण्यात आला. मात्र, पोलिसांनी या संदर्भात दिलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

या प्रकरणाला कठुआ गॅंग रेपशी जोडलं जात असून काही बॉलिवूड अभिनेत्रींवर निशाणा साधला जात आहे. काही नेटीझन्सनी या प्रकरणाला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कठुआ गॅंग रेप प्रकरणात बोलणाऱ्या आता गप्प का असा सवाल नेटकरी करत आहेत. मात्र, पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर या लोकांचे दावे खोटे असल्याचं समोर आलं आहे.

काय म्हटलंय पोलिसांनी?

‘दोन वर्ष सहा महिन्याच्या ट्विंकल वर बलात्कार झाला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाली असून पोलिसांनी या प्रकरणात जाहिद व असलम यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचं अलिगढ पोलिसांनी म्हटलं आहे.

का झाली हत्या?

मुलीचे डोळे काढून तिच्या शरिरावर अॅसिडचा वापर करण्यात आला का?

सोशल मीडियासह अनेक माध्यमांनी मुलीवर बलात्कार करुन तिचे डोळे काढून तिच्या अंगावर अॅसिड टाकल्याचे वृत्त दिलं आहे. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टनुसार असा कुठल्याही उल्लेख नसून पोलिसांनी असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे सोशल मीडियासह अनेक माध्यमांनी मुलीवर बलात्कार करुन तिचे डोळे काढून तिच्या अंगावर अॅसिड टाकल्याचे वृत्त दिलं आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं पोलिसांनी दिलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमुळे समोर आलं आहे. त्यामुळे नेटिझन्सनी अशा मेसेजवर विश्वास न ठेवता फॉरवर्ड करु नये. मात्र, पैशासाठी एका मुलीचा मृत्यू होणं ही शर्मेची बाब असून याचा निषेध होणं गरजेचं आहे.

Updated : 7 Jun 2019 4:15 AM GMT
Next Story
Share it
Top