Home > मॅक्स रिपोर्ट > मुंबईचे रस्ते गेले खड्ड्यात...

मुंबईचे रस्ते गेले खड्ड्यात...

मुंबईचे रस्ते गेले खड्ड्यात...
X

मुंबईत १ हजार ८७ किलोमीटरचे रस्ते आहेत. नेमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दरवर्षी पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण होते. कोट्यावधी रुपये खर्चूनही खड्डे बुजले जात नाही. देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतील रस्त्यांची ही दुरावस्था आहे. मुंबई पालिकेने थोडेथोडके नाही तर तब्बल २१ हजार कोटी रुपये मागील दहा वर्षात खर्च केलेत.

त्यानंतरही रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून वर्षानुवर्षे खड्ड्यांचे प्रमाण वाढतचं आहे. करदाते म्हणून मुंबईकरांकडून हजारो कोटी वसूल केले जात असताना सुमार रस्तेकामामुळे पालिकेला मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. राजकीय आरोप- प्रत्यारोप होतात परंतू मुंबईकर मात्र खड्यातून त्यांची रोजची वाट काढतात... मॅक्स महाराष्ट्राचा खड्ड्यावरील ग्राऊंड रिपोर्ट.......


Updated : 2021-09-30T19:12:21+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top