Home > Election 2020 > गृहराज्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा भाजप उमेदवाराला उघडपणे विरोध

गृहराज्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा भाजप उमेदवाराला उघडपणे विरोध

गृहराज्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा भाजप उमेदवाराला उघडपणे विरोध
X

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप समोरच्या अडचणीत सातत्यानं वाढ होतांना दिसतेय. त्यात आता राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजितसिंह पाटील यांचे मेव्हणे चित्रसेन पाटील यांनीही जळगाव लोकसभेतील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांना जाहीरपणे विरोध करायला सुरूवात केलीय.

लोकसभा मतदारसंघात भाजपसमोर नाराजांचं एकामागून एक संकट पुढं येऊन ठाकत आहे. चाळीसगावचे भाजप आमदार तसेच जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील यांना मतदान करू नका, असं सांगत बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे मेव्हणे (शालक) चित्रसेन पाटील यांनी उन्मेष पाटील यांना विरोध केलाय. त्यामुळं उन्मेष पाटील यांच्या वाटेत स्वतःच्या मतदारसंघातच अडचण निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

चित्रसेन पाटील यांनी उन्मेष पाटील यांच्या विरोधात मोट बांधली आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी चाळीसगावात पत्रकार परिषद घेतली. चाळीसगाव तालुक्यातून उन्मेष पाटील हे ५० हजार मतांनी मागं राहतील, असा दावा करत चित्रसेन पाटील यांनी भाजपविरुद्ध प्रचार करत एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला उघड उघड मदत केल्याचं बोललं जातंय. आमदार उन्मेष पाटील हे भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप करीत भाजपश्रेष्ठींना याबाबत माहिती नसेल का असाही सवाल देखील चित्रसेन पाटील यांनी उपस्थित केलाय.

२०१४ च्या निवडणुकीत ज्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कळीच्या मुद्दयावर उन्मेष पाटील चाळीसगावचे आमदार म्हणून निवडून आले. तो साखर कारखाना सुरू होऊ नये, यासाठी उन्मेष पाटील यांनी आमदार झाल्यावर द्वेषाचे राजकारण केलं. यामुळं तालुक्याला अधोगतीकडे नेणाऱ्या उन्मेष पाटील यांना मतदान करताना जळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेने चाळीसगाव तालुक्यातील त्यांच्या नातेवाईकांना विचारावं की उन्मेष पाटलांना मतदान करावं की नाही ? असेही चित्रसेन पाटील म्हणाले.

पाहा चित्रसेन पाटील काय बोलले.

https://youtu.be/-iexrRlhuhM

Updated : 12 April 2019 11:28 AM GMT
Next Story
Share it
Top