Home > मॅक्स किसान > महाराष्ट्रात 'या' दिवशी होणार मान्सून दाखल

महाराष्ट्रात 'या' दिवशी होणार मान्सून दाखल

महाराष्ट्रात या दिवशी होणार मान्सून दाखल
X

राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने उष्णतेपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यातच यंदा मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राची परिस्थिती अधिकच बिकट झाली असून राज्यातील पाणीसाठे आटले आहेत.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार (आयएमडी) केरळात येत्या दोन दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात 7 जूनला दाखल होणाऱ्या मान्सून यंदा 18 ते 20 जून दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील 96 तासांत मान्सून केरळात...

पुढील ९६ तासांत मान्सून केरळला दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून त्यानंतर ओडिशा आणि केरळच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मान्सून बरसण्याची शक्यता आहे.

Updated : 5 Jun 2019 3:54 AM GMT
Next Story
Share it
Top