News Update
Home > Election 2020 > #ModiSarkar2 – मोदींच्या १२ मंत्र्यांनी घेतली इंग्रजीतून शपथ

#ModiSarkar2 – मोदींच्या १२ मंत्र्यांनी घेतली इंग्रजीतून शपथ

#ModiSarkar2 – मोदींच्या १२ मंत्र्यांनी घेतली इंग्रजीतून शपथ
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशप्रेम सर्वश्रूत आहे. त्यांची हिंदी भाषेवरील पकड आणि प्रेमही सगळ्यांना माहित आहे, शिवाय मोदी हे हिंदीसाठी आग्रही असतात. मात्र, मोदींच्याच समोर त्यांच्या तब्बल १२ मंत्र्यांनी मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ ही इंग्रजीतून घेतलीय. तर दुसरीकडे ४६ जणांनी हिंदीतून शपथ घेतलीय. मातृभाषा पंजाबी असलेल्या तीन मंत्र्यांनीही इंग्रजीतून शपथ घेतलीय. महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, अरविंद सावंत, संजय धोत्रे आणि प्रकाश जावडेकर यांनी हिंदीत शपथ घेतली.

आजवर दक्षिण भारतातून येणारे मंत्री हे इंग्रजीतून शपथ घेतात, तीच परंपरा यावेळीही दिसून आली. सदानंद गौडा, निर्मला सीतारमण, प्रल्हाद जोशी, एस. जयशंकर आणि वी. मुरलीधरन या दक्षिणेतून येणाऱ्या खासदारांनी इंग्रजीतून शपथ घेतली. यासर्व दक्षिणेतल्या खासदारांमध्ये तेलंगणा इथल्या जी. किशन रेड्डी या युवा मंत्र्यांनी हिंदीतून शपथ घेतली हे विशेष. पश्चिम बंगालमधल्या बाबुल सुप्रियो आणि देबश्री चौधरी यांनीही हिंदीत शपथ घेतली. हरियाणाचे इंद्रजीत सिंह, मूळ पंजाबी असलेले हरदीप सिंह पुरी, हरसिमरन कौर बादल, सोमप्रकाश, सुरेशचंद्र बसप्पा अंगाडी यांनीही इग्रजीतूनच शपथ घेतली.

Updated : 30 May 2019 5:49 PM GMT
Next Story
Share it
Top