‘मोदी हे जागतिक नेते’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून (शुक्रवारी) तीन आखाती देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान पॅलिस्टाइन, युएई आणि ओमान या देशातील नेत्यांची भेट घेणार आहेत. गल्फ आणि वेस्ट एशियन भाग हा भारतासाठी महत्त्वाचा आहे. मोदींच्या दौऱ्याने भारताचे या देशांसोबतच्या संबंधांना बळकटी मिळण्यास मदत होईल. सौ. दैनिक भास्कर वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखातीत पॅलेस्टाइनचे पंतप्रधान डॉ. रामी हमदल्लाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते असल्याचे म्हटलं आहे.

नेमकं काय बोलले पॅलेस्टाइनचे पंतप्रधान?

दरम्यान ‘मोदी हे पश्चिम आशियातील नेत्यांवर आपल्या प्रभावाद्वारे इस्रायलसोबत आमचा वाद सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दावोसमध्ये मोदींनी हवामान बदल व जागतिक आर्थिक सहकार्याबाबत संयुक्त वैश्विक उपाययोजनांचे आवाहन केले होते. अाम्ही त्याला पाठिंबा देतो.’ पुढे ते म्हणाले, भारत आर्थिक व राजकीय शक्ती म्हणून उदयास येणे ही आमच्यासारख्या देशांसाठी चांगली बाब आहे. भारत-पॅलेस्टाइनदरम्यान त्यांचा हा दौरा नव्या संधींचे सृजन करेल.

तसेच, पाकिस्तानातील सभेत आमच्या राजदूताने मुंबई हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईदसोबत एकाच व्यासपीठावर येणे ही आमची अजाणतेपणी झालेली चूक असल्याचे मान्य करत तिचे समर्थन केले जाऊ शकत नाही असं देखील म्हटलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here