Home > Election 2020 > विखे-पाटलांसोबतच जाणार - आमदार अब्दुल सत्तार

विखे-पाटलांसोबतच जाणार - आमदार अब्दुल सत्तार

विखे-पाटलांसोबतच जाणार - आमदार अब्दुल सत्तार
X

लोकसभेचा निकाल २३ तारखेला लागला यात काॅंग्रेसचा पराभव झाला. मात्र आता या पराभवाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. काॅंग्रेसचे नाराज आमदार राधाकृष्ण विखे पाटील १ जून २०१९ या दिवशी मंत्री पदाची शपथ घेताील, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. संगमनेर येथे एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे स्वतः राधाकृष्ण विखे पाटीलही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

दरम्यान विखे पाटील यांनी विधान सभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वांचे लक्ष त्यांची पुढची भुमिका काय असेल याकडे लागले होते. त्यातच शनिवारी लोणी येथे विखे समर्थक १३ आमदारांची गुप्त बैठक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विखे पाटलांसोबत अब्दुल सत्तार यांच्यासह आणखी किती आमदार भाजपात जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्या मुळे काॅंग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Updated : 27 May 2019 10:28 AM IST
Next Story
Share it
Top