Home > Election 2020 > वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या तेजबहादूर यांचा का झाला उमेदवारी अर्ज रद्द?

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या तेजबहादूर यांचा का झाला उमेदवारी अर्ज रद्द?

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या तेजबहादूर यांचा का झाला उमेदवारी अर्ज रद्द?
X

स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट वाराणसीतच माजी सैनिकाकडून आव्हान उभं करण्याचा समाजवादी पक्षानं प्रयत्न केला. पण माजी सैनिक तेजबहादूर यांची उमेदवारी निवडणूक आयोगानं रद्द केल्यानं समाजवादी पार्टीला मोठा झटका बसला आहे. तेजबहादूर यांनी दोन वेळा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. २४ एप्रिललला अपक्ष म्हणून तर २९ एप्रिलला समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याने दोनही अर्ज रद्दबातल ठरवले आहे.

असा झाला अर्ज रद्द

30 एप्रिलला निवडणूक अधिकाऱ्याची जवान तेजबहादूरला नोटीस

नोटीसमध्ये सीमा सुरक्षा दलातून निलंबित का करण्यात आलं? याचे पत्र मागितले

सरकारी अधिकाऱ्यांकडून नोटीसला उत्तर देण्याचा वेळ चुकला

90 वर्षांनंतर कार्यालयात उपस्थित राहण्याचा म्हणजे 1 मे 2109 ला उपस्थित राहण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

निवडणूक आयोगाने पहिल्या नोटीसमधील चूक सुधारुन तेजबहादूरला सुधारित नोटिस पाठवली.

1 मे 2019 ला अकरा वाजता सीमा सुरक्षा दलाकडून निलंबनासंदर्भात पत्र घेऊन येण्याचा आदेश

24 एप्रिलला तेजबहादूर यादव यांच्या अपक्ष म्हणून भरलेल्या अर्जात सरकारी सेवेतून भ्रष्टाचार किंवा देशद्रोहाच्या आरोपांसाठी निलंबित करण्यात आलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर तेजबहादूर यांनी हो असं लिहिलं होतं.

29 एप्रिलला भरलेल्या दुसऱ्या अर्जात एक शपथपत्र जोडून 24 एप्रिलला भरलेल्या अर्जात चुकून हो असं लिहिल्याचं स्पष्टीकरण तेजबहागूर यांनी दिलं.

मात्र, तरीही तेजबहादूर यांचा अर्ज निवडणूक आयोगानं रद्द केला.

का झाला तेजबहादूर यांचा अर्ज रद्द?

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला पाच वर्षं निवडणूक लढवता येत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. त्यामुळे तेजबहादूर यांचा अर्ज रद्द करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान वाराणसी मतदारसंघातून एकूण 101 अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी 71 अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केले आहेत.

कोण आहेत तेजबहादूर?

बीएसएफमध्ये कार्यरत असताना तेजबहादूर यादव यांनी सैन्यात मिळणा-या निकृष्ट दर्जाच्या जेवनाबद्दल तक्रार केली होती, त्यासंदर्भातील व्हिडिओ देशभऱ व्हायरल झाल्यानंतर सैन्यावर प्रचंड टीकाही केली गेली होती. त्यामुळे यादव यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. आता यादव यांनी थेट पंतप्रधानांना निवडणूकीच्या माध्मयातून आव्हान देत व्यवस्थेवरील राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता. देशापुढील मुख्य समस्या शेतक-यांच्या आणि तरुण बेरोजगारांच्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे यादव यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं.

उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपानं युती केली आहे. वाराणसीची जागा ही समाजवादी पक्षाच्या वाट्याला आली आहे. याखेरीज काँग्रेसकडून अजय राय हे वाराणसीमधून मोदींविरोधात निवडणूक लढवत आहे.

येत्या 19 मे ला म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात वाराणसीत मतदान होणार आहे. समाजवादी पक्षाने अलीकडेच वाराणसी मतदारसंघातून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण सोमवारी समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांच्याऐवजी सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादुर यादव यांना उमेदवारी जाहीर केली. शालिनी यादव या माजी काँग्रेस खासदार आणि माजी राज्यसभा सभापती श्यामलाल यादव यांच्या सुन आहेत.

गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपले नजिकचे प्रतिस्पर्धी आणि सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 3,71,784 मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला होता. नरेंद्र मोदी यांना एकूण 5,81,022 मते मिळाली होती. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना 2,09, 238 मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार अजय राय 75,614 मतांसह तिसऱ्या स्थानावर होते. तर चौथ्या स्थानावर बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार पाचव्या स्थानावर होते. त्यामुळे गेल्या निवडणूकीत पाचव्या स्थानावर असलेल्या समाज वादी पार्टीला यावेळी कसा प्रतिसाद मिळतो यावरच यादव यांच्या राजकीय आकांक्षा अवलंबून आहेत.

Updated : 2 May 2019 5:52 AM GMT
Next Story
Share it
Top