Home > मॅक्स रिपोर्ट > पुरुषांना फ्री सेक्स..

पुरुषांना फ्री सेक्स..

पुरुषांना फ्री सेक्स..
X

मधू किश्वरच्या ट्वीट मागचा अर्थ काय?

'प्रत्येक पुरुषाला वर्षातील ठराविक दिवस फ्री सेक्स चं आश्वासन देई पर्यंत वाट पाहा' उजव्या विचारधारेच्या पत्रकार मधू किश्वर यांच्या या ट्वीटवरून सध्या सोशल मिडीयावर बराच गोंधळ माजला आहे. मधू किश्वर यांनी गरींबांसाठी किमान उत्पन्नाच्या घोषणेची खिल्ली उडवत असताना मधू किश्वर यांनी फ्री सेक्स संदर्भातलं ट्वीट केलं आहे.

मधू किश्वर यांच्या या ट्वीट नंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर बरीच टीका केली आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी मधू किश्वर यांच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलंय की, ' सेक्स तर फ्री असतो, तुम्ही वेगळ्या पद्धतीने का विचार करताय?'. पत्रकार राहुल देव यांनी तर मधू किश्वर यांनी असं ट्वीट केलं यावर विश्वासच बसत नाही असं म्हटलंय.

सोशल मिडीयावरील अनेकांनी तर या ट्वीट बाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. सेक्स फ्री आहे, तुम्ही कधी सेक्स साठी नवऱ्याकडून पैसे घेतलेयत का अशा पद्धतीच्या खालच्या स्तरावरील ही अनेक प्रतिक्रीया मधू किश्वर यांच्या वॉल वर बघायला मिळतायत.

देशाची अर्थव्यवस्था पाहता काहीही मोफत देण्याची घोषणा योग्य नाही. लोकांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, राहुल असोत किंवा मोदी, कुणीही देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळू नये हे सांगण्यासाठी आपण फ्री सेक्सचं उदाहरण वापरत ट्वीट केलं होतं असं मधू किश्वर यांनी म्हटलंय.


Updated : 2020-12-23T08:46:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top