Home > Election 2020 > ...तर भारतापासून काश्मीर वेगळा होईल - मेहबूबा मुफ्ती

...तर भारतापासून काश्मीर वेगळा होईल - मेहबूबा मुफ्ती

...तर भारतापासून काश्मीर वेगळा होईल - मेहबूबा मुफ्ती
X

३७० कलम रद्द होताच काश्मीरचे भारताशी असलेले नाते संपुष्टात येईल. काश्मीर भारतापासून वेगळा होईल, असा इशारा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करण्याबाबतची डेडलाइन तयार करत असतील तर जम्मू-काश्मीरच्या जनतेचीही डेडलाइन तयार आहे. असं म्हणत मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. दरम्यान, अमित शहा यांनी २०२० पर्यंत काश्मीरमधून अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर मुफ्ती यांनी हा इशारा दिला आहे.

हे ही वाचा :

व्हिडीओ : हे आहे जम्मू-काश्मीरमधील कलम ३५ 'अ

आज मुफ्ती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

काय म्हणाल्या मेहबूबा मुफ्ती?

“जम्मू-काश्मीर ज्या अटींवर भारतात समाविष्ट झाला आहे, त्याच अटी-शर्ती काढून घेतल्या जात असतील तर आम्ही भारताशी असलेले आमचे नाते तोडून टाकू. संविधानातील अनुच्छेद ३७० किंवा ३५ ए हटविल्यास काश्मीर भारतापासून वेगळा होईल, असं त्या म्हणाल्या”

हे ही वाचा :

काश्मीर समजून घेतांना...

Updated : 3 April 2019 9:34 AM GMT
Next Story
Share it
Top