भाजपच्या काऴात झालेल्या दलित अत्याचाराचं काय ? – मायावती
Max Maharashtra | 14 May 2019 8:34 AM IST
राजस्थानातील अलवार येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सध्या आरोप- प्रत्यारोप होत आहेत.
अलवार घटनेवरून मायावती गप्प का बसल्या? त्यांना या घटनेचं जर खरंच इतकं दुःख वाटत असेल तर त्यांनी राजस्थान सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा
असं आव्हान पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर मायावतींनीही
भाजपच्या काळात झालेल्या दलित अत्याचारांचं काय
असा प्रतिप्रश्न करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर पदेशातील कुशीनगर येथील प्रचारसभेत मायावतींला लक्ष्य केलं. राजस्थानातील काँग्रेस सरकारचा पाठिंबा मायावतींनी काढून घ्यावा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी मायावतींना केलं होतं. यावर बसपाला माहीत आहे काँग्रेसशी कसे वागायचं. अलवार प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, मात्र मोदींनी अलवार सामूहिक बलात्कार प्रकरणावरून घाणेरडं राजकारण करू नये, अशा शब्दांत मायावतींनीही मोदींवर सडकून टीका केली. गुजरातमधील उना येथील दलित कांड आणि रोहित वेमुला या प्रकरणाचा उल्लेख करून मोदींच्या राजीनाम्याचीही मायावती यांनी मागणी केली.
Updated : 14 May 2019 8:34 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire