MaxMaharashtra Impact: बच्चू कडू यांची दिव्यांग महिलेला तात्काळ मदत...
X
लॉकडाऊन (lockdown) म्हटलं की, आता अनेकांच्या पोटात गोळा येतो. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लावलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. लाख लाख रुपयांचा पगार घेणाऱ्यांपासून 10 आणि 15 हजार रुपये महिन्याला पगार घेणाऱ्या लोकांना सध्या घरी बसावं लागलं आहे.
त्यातच मुंबईत राहणाऱ्या दिव्यांगाची नक्की काय परिस्थिती आहे. या संदर्भात आम्ही दिव्यांग भानूप्रिया यांची भेट घेत त्यांची व्यथा मॅक्समहाराष्ट्र वर मांडली होती.
‘मंत्रीपद मिळाल्यानंतर बच्चू कडू दिव्यांगाना विसरले का? दिव्या मंत्रालयाची पायरी झिजवूनही मदत नाही..’ या ठळक मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर 1 तासात मॅक्समहाराष्ट्र शी संपर्क साधून सदर महिलेला तात्काळ मदत केली.
हे ही वाचा...
मंत्रीपद मिळाल्यानंतर बच्चू कडू दिव्यांगाना विसरले का? दिव्या मंत्रालयाची पायरी झिजवूनही मदत नाही..
भानुप्रिया ह्या राज्यस्तरीय अपंग जलतरण स्पर्धेत विजेत्या आहेत. जनशक्ती पक्ष मुंबई संपर्क अध्यक्ष adv अजय तापकीर आणि प्रहार जनशक्ती पक्ष प्रवक्ता मनोज टेकाडे, मयूर महाजन, यांनी बच्चूभाऊ कडू यांच्या सांगण्यावरुन तात्काळ त्यांची भेट घेतली आणि भानुप्रिया यांना मदत केली. यावेळी भानुप्रिया यांनी मॅक्समहाराष्ट्र आणि मंत्री बच्चू कडू यांचे आभार मानले.