Home > Election 2020 > #maxmaharashtra Impact - मॅक्स महाराष्ट्रच्या दणक्यानंतर कल्याणमध्ये रस्ता तयार झाला

#maxmaharashtra Impact - मॅक्स महाराष्ट्रच्या दणक्यानंतर कल्याणमध्ये रस्ता तयार झाला

#maxmaharashtra Impact - मॅक्स महाराष्ट्रच्या दणक्यानंतर कल्याणमध्ये रस्ता तयार झाला
X

मॅक्स महाराष्ट्र च्या बातमीचा परिणाम कल्याणमध्ये दिसून आला. २०१३ पासून शहर विकास आराखड्यात असणारा रस्ता लोकांनी शेकडो अर्ज, उपोषणे, पालिकेच्या आयुक्त कार्यालयाचे हेलपाटे घालून सुद्धा रस्ता होत नव्हता, तेंव्हा येथील नागरिकांनी, रस्ता नाही तर, मतदान नाही, असा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणारा निर्णय घेतला, लोकांच्या या आंदोलनाला "मॅक्स महाराष्ट्र ने आवाज दिला, त्यामुळे निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासन जागे झाले आणि तीन दिवसात रस्ता वाहतुकीला खुला झाला.

येथील नागरिकांनी 'मॅक्स महाराष्ट्र' चे आभार मानले, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आपल्या परिसरात असे नागरी प्रश्न असतील, आपल्या, न्याय मागण्यांना शासन-प्रशासन दाद देत नसेल तर तुम्ही देखील आमच्याशी संपर्क करू शकता आणि लोक आंदोलनाच्या सोबत राहणारी पत्रकारिता करतो.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/335164660469340/?t=1

Updated : 20 April 2019 2:01 PM GMT
Next Story
Share it
Top