Home > मॅक्स रिपोर्ट > Max Maharashtra Impact : बीडमध्ये रस्ते दुरुस्तीला सुरूवात

Max Maharashtra Impact : बीडमध्ये रस्ते दुरुस्तीला सुरूवात

Max Maharashtra Impact : बीडमध्ये रस्ते दुरुस्तीला सुरूवात
X

सामान्यांच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रच्या आणखी एका बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. बीड शहरातून जाणाऱ्या महामार्गांची दूरवस्था झाल्याचे वास्तव मॅक्स महाराष्ट्रने मांडले होते. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेऊन लवकरच खड्डे बुजवले जातील असे सांगितले होते. आता या खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

बीड शहरातून जाणारे महामार्ग आहेत की मृत्यूचा सापळा? असा प्रश्न उपस्थित करत मॅक्स महाराष्ट्रने 14 ऑक्टोबर रोजी इथली परिस्थिती मांडली होती. बीड शहरातील मुख्य महामार्गांवर अर्धा ते एक फुटापर्यंतचे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तर काही ठिकाणी तर 5 फूट लांब खड्डे पडले आहेत. यामुळे बीडकरांसह प्रवाशांना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. यामुळे लोकप्रतिनिधींबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता.

बीड शहरातून तीन मुख्य मार्ग जातात. यामध्ये बीड-सोलापूर, बीड-अहमदनगर, बीड-जालना हे मुख्य मार्ग शहरातून जातात. मात्र या मार्गांवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर जवळपास अर्धा ते एक फुटांपर्यंत खोल असे खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे वाहनाचे तर नुकसान होतच आहे पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा रुग्णालयासमोर रस्त्याची दूरवस्था झाली आहे. गेल्यावर्षी याच ठिकाणी खड्डा चुकवताना एका नर्सला आपला जीव गमवावा लागला होता. मात्र तरीदेखील या मार्गावरील खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही म्हणून नागरिकांमध्ये संताप होता. अखेर आता प्रशासनाने या त्रासाची दखल घेत कामाला सुरूवात केली आहे.


Updated : 20 Oct 2021 12:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top