Home > मॅक्स रिपोर्ट > MaxMaharashtra Impact : मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या घोटाळ्यात पहिला गुन्हा दाखल

MaxMaharashtra Impact : मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या घोटाळ्यात पहिला गुन्हा दाखल

हजारो शेतकऱ्यांचे तब्बल 'पाचशे कोटीं'पेक्षा अधिकचे पैसे गुंतले

MaxMaharashtra Impact : मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या घोटाळ्यात पहिला गुन्हा दाखल
X

मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा समजल्या जाणाऱ्या 'तीस-तीस' घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकरण सर्वात आधी Max Maharashtra समोर आणले होते. तसेच गेली दहा महिने Max Maharashtra या सर्व घोटाळ्याबद्दल आवाज उठवत होता.त्यांनतर अखेर औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तर यातील मुख्य आरोप संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अधिकचा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून संतोष राठोड याने 'तीस-तीस' योजनेत पैसे गुंतवण्यासाठी आमिष दाखवले. बँकेत मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक व्याज देऊन सुरवातील स्व:ताची मार्केटींग केल्यानंतर राठोड गेल्या 8 महिन्यापासून फरार आहे. त्यामुळे पैसे मिळण्याची अपेक्षाभंग झाल्याने पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणाऱ्या महिलने बिडकीन पोलीस गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा घोटाळा तब्बल 500 कोटी पेक्षा अधिकचा आहे. विशेष म्हणजे यात मोठ्याप्रमाणावर शेतकरी अडकले आहे. ज्या भागात सरकारी प्रकल्प राबवली जातात, त्या भागातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर राठोड याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना आपल्या जाळात अडकवले. पोलीस आता राठोड याचा शोध घेत असून, तो सद्या फरार झाला असल्याचे बोलले जात आहे.

'तीस-तीस' घोटाळा म्हणजे काय?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याच काम या तरुणाने केलं.

काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 8 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.

Updated : 16 Nov 2021 4:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top