Home > मॅक्स रिपोर्ट > #Max Maharashtra Impact मृत भावेशच्या कुटूंबियांना मिळणार 4 लाखाची मदत

#Max Maharashtra Impact मृत भावेशच्या कुटूंबियांना मिळणार 4 लाखाची मदत

महावितरणच्या गलथान कारभारामुळे जीव गमावलेल्या भावेशसाठी केलेल्या मॅक्समहाराष्ट्रच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे.मृत भावेशच्या कुटूंबियांना 4 लाखाची मदत मिळणार आहे. प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा रिपोर्ट

#Max Maharashtra Impact मृत भावेशच्या कुटूंबियांना मिळणार 4 लाखाची मदत
X

घरची परिस्थिती हालाखीची…...पती मानसिकदृष्ट्या सक्षम नाही, पोरगं शिकून आम्हाला चांगलं दिवस आणील, या आशेने आई काबाड कष्ट करून मामाच्या गावाला राहून मुलाला शिक्षण देत होती. दहावी पास झालेला मुलगा लवकरच कॉलेजला जाईल ही आईची आशा.... परंतु या रंगवलेल्या स्वप्नांवर एक दिवस अचानक काळाने घाला घातला. भावेश हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात वडाच्या झाडावर मुलांसोबत खेळायला गेला, परंतु तिथे सुरू असलेल्या वीजेच्या मेन लाईनचा शॉक लागून तो झाडावरून खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली व उपचारा दरम्यान नाशिकमध्ये त्याचा मृत्यू झाला होता.

मोखाडा तालुक्यातील भेंडीचापाडा या आदिवासी पाड्यातील दहावीत शिकणारा भावेश कृष्णा भुरकूट वय (17) याचा आठ नऊ महिन्यांपूर्वी मोखाडा इथून खोडाळ्याकडे जाणाऱ्या नवीन मेनलाईनचा शॉक लागून मृत्यू झाला होता.

ही घटना महावितरणच्या गलथान कारभारामुळे घडलीअसताना याकडे कुणीही लक्ष दिले नाही ईथे ना लोकप्रतिनिधी फिरकले ना प्रशासन परंतु या घटनेचे भयाण वास्तव मॅक्समहाराष्ट्राने चव्हाट्यावर आणल्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले सतच्या पाठपुराव्यामुळे मृत्यु भावेश च्या कुटूंबियांना 4 लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच ही मदत त्या कुटूंबियाकडे सुपूर्द केली जाणार असल्याचे मोखाडा वीज महामंडळाचे कार्यकारी मनोहर जाधव यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले

एकुलता एक मुलगा गेल्याने या घटनेचा त्याच्या आईवर गंभीर परिणाम होऊन, मोठा मानसिक धक्का बसला आहे. परंतु मॅक्स महाराष्ट्र चा पाठपुराव्यामुळे मदत मिळणार असल्याने मृत भावेश च्या कुटूंबियांनी मॅक्समहाराष्ट्राचे आभार मानले आहेत.

Updated : 18 May 2022 6:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top