Home > मॅक्स रिपोर्ट > #MaxMaharashtraImpact मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं मरकटवाडीच्या रस्त्याच्या कामाला सुरवात

#MaxMaharashtraImpact मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं मरकटवाडीच्या रस्त्याच्या कामाला सुरवात

#MaxMaharashtraImpact मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं मरकटवाडीच्या रस्त्याच्या कामाला सुरवात
X

एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांना दुसरीकडे एका गरोदर मातेला वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जुळ्या बालकांना प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला विधीमंडळातही या घटनेवरून मोठा गदारोळ झाल्याचे पहायला मिळाले मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ठाणे बांधकाम विभागाचे अधिक्षक विलास कांबळे यांनी रस्त्याची पाहणी करून अखेर 2 तारखेला या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे तसेच मॅक्समहाराष्ट्र हे वृत्त सर्वप्रथम प्रसिध्द करुन या घटनेचा सातत्याने पाठपुरावा केला होता.

मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडीला रस्ता नसल्याने, वंदना यशवंत बुधर या सात महिन्याच्या गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या यावेळी कुटुंबियांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला, आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली, तिने 108 एमबुलन्स सुद्धा बोलावली, मात्र मुख्य रस्ता ते मरकटवाडीला गावात जाण्यासाठी रस्ता न्हवता. दरम्यान महिलेला खूपच वेदना होत होत्या, तिची प्रसूती घरातच झाली, तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला मात्र सात महिन्याची प्रसूती असल्याने बालक कमकुवत होते, त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करणे आवश्यक होते, काही वेळातच उपचारा अभावी दोन्ही बालकांनी प्राण सोडला.

दरम्यान रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती खालावत होती, तिला गावकऱ्यांनी झोळी करून डोंगर दऱ्या कपारीतून थेट 3 किमी अंतर पार करत मुख्य रस्त्यावर आणले तेथून तिला एमबुलन्सद्वारे खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले,

परंतु या घटनेने मरकट वाडीच्या रस्त्याचा प्रश्न चांगलाच चव्हाट्यावर आला आहे याची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीरतेने दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले त्या अनुषंगाने बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांनी 27 तारखेला शनिवारी मरकटवाडीला भेट देऊन आढावा घेतला यावेळी आठ दिवसात या रस्त्याची शासकीय प्रकिया पूर्ण करून 4 कोटी 15 लाखाच्या कामाला मंजुरी दिली जाणार असून तीन महिन्यात काम पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते अनुषंघाने मरकटवाडीच्या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली असून यामुळे ग्रामस्थांनी देखील आभार व्यक्त केले आहेत.

Updated : 2 Sep 2022 2:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top