Home > मॅक्स रिपोर्ट > चाळीसगाव धुळे महामार्गावर वाहनधारकांची कसोटी, मागील ४ महिन्यात २५ ते ३० अपघात

चाळीसगाव धुळे महामार्गावर वाहनधारकांची कसोटी, मागील ४ महिन्यात २५ ते ३० अपघात

चाळीसगाव धुळे महामार्गावर वाहनधारकांची कसोटी, मागील ४ महिन्यात २५ ते ३० अपघात
X

चाळीसगाव धुळे महामार्ग क्रंमाक २११ वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कन्नड घाटापासून तर धुळे पर्यंत हा ७५ तर ते ८० किलोमीटरचा रस्ता आहे. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याचं काम नव्यानं झालेलं नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार निधी मिळून देखील रस्त्याचं काम व्यवस्थित होत नाही. तात्पुरते खड्डे बुजवण्याच कामं केलं जातं आणि परत काही दिवसांनी तेच चित्र प्रवश्यासमोर उभं राहतं. एकवेळेस दिवसा वाहनधारक या रस्त्यावरुन खड्डे चुकवत प्रवास करुन शकतात मात्र, रात्रीच्या वेळेस प्रवाशांची कसोटी लागते.

मिळालेल्या माहीतीनुसार या रस्त्यावर मागील ४ महिन्यात २५ ते ३० मोठे अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये अनेक व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. तरीही या रस्त्याचं काम अजून चालु झालेलं नाही ही मोठी खंत आहे. या मतदारसंघातील खासदार उन्मेष पाटील यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी या संदर्भात बोलण्यास होकार दिला मात्र, काही कारणानिमीत्ताने चाळीसगाव येथे उपलब्ध नसल्यानं आपण नंतर बोलू असं सांगत, टाळाटाळ केली.

कन्नड घाटापासून ते तरवाडे बारीपर्यंत धुळे-सोलापूर महामार्गाची चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे या मार्गावरून वाहन चालविणे. अत्यंत जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या असुन वाहन चालकांना जीवमुठीत धरून वाहनं चालवावी लागत आहेत. विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी, दावे, प्रतीदावे लोकप्रतीनिधी निवडणूकीच्या वेळेस करतात. मात्र, जेव्हा वेळ येते. तेव्हा अशा प्रकाराचे चित्र पाहायला मिळते. या रस्त्यालगत असलेली गाव आणि वाहनधारकांची गैरसोय या रस्त्यामुळे होते.

हे ही वाचा...

‘माणसांवर राग काढा, पण पक्षावर काढू नका’ यातून चंद्रकांत पाटलांना काय सुचवायचंय?

कामाठीपुरातील वेश्या म्हणतात ‘इकडे या पैसे दया, पाहिजे ते करा पण बलात्कार थांबवा…!’

बीएमसीच्या केईएम रुग्णालयात एका बेडवर तीन – तीन रुग्णांवर उपचार !

नागरीकांच्या म्हणण्यानूसार रस्त्याचं कामं करतांना मातीचा वापर केला जातो म्हणून रस्ता निकृष्ठ दर्जाचा बनतो. यामुळे रस्ता लवकर खराब होऊन अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे आता या रस्त्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. नाही तर अजून बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागेल एवढं मात्र नक्की.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी २०१६ मध्ये या रस्त्यासाठी १५ हजार कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून धुळे ते औरंगाबाद या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात येणार होते. त्या वेळेसचे मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले की, धुळे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ जातो. त्याचे चौपदरीकरण होणं गरजेचे आहे. या कामाला चालना मिळावी यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला गेला होता.

सुभाष भामरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत महामार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला असं देखील सुभाष भामरे यांनी त्यावेळेस म्हटलं होतं. २०१६ मध्ये १५ हजार कोटी मंजूर झाले. मात्र, प्रत्यक्ष काम १५ कोटीचं देखील नाही असं रस्त्याच्या अवस्थेवरुन लक्षात येतं. एवढा पैसा मंजूर होऊन देखील काम होत नसेल. रस्त्यांची अवस्था खराब असेल तर लोकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावावच लागेल हे मात्र, नक्की..

Updated : 13 Dec 2019 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top