Home > मॅक्स रिपोर्ट > 'मराठा समाजाला असं मिळणार आरक्षण'

'मराठा समाजाला असं मिळणार आरक्षण'

मराठा समाजाला असं मिळणार आरक्षण
X

मराठा समाजासाठी सर्वात महत्वाची बातमी... राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेला मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच मराठा आऱक्षणाचा मुद्दा याच अधिवेशनात सोडवण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षणावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

  • राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल कॅबिनेटने स्वीकारला
  • मराठा समाजाला आरक्षण मिळणार
  • स्वतंत्र आरक्षण देण्यासंदर्भात मंत्रीमंडळाचा निर्णय, याच अधिवेशनात निर्णय होणार

आयोगाकडून तीन शिफारशी

1) मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास

2) शासकीय, निमशासकीय क्षेत्रात पुरेसं प्रतिनिधित्व नाही

3) मराठा समाज मागास घोषित केल्यामुळे मराठा समाज आरक्षणाला पात्र

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

  • आरक्षणाच्या प्रश्नाचा उपयोग समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, विरोधी पक्षांकडूनही काही प्रमाणात याला खतपाणी घातलं जातंय.
  • खरी आकडेवारी देणं हे विरोधकांचं काम आहे, पण खोटी आकडेवारी देऊन आपल्याच राज्याची बदनामी केली जात आहे.
  • विरोधकांनी त्यांच्या काळात कर्जमाफी झालेली यादी द्यावी, आमच्याकडे सर्व यादी आणि तपशील उपलब्ध आहे.

धनगर आरक्षणावर काय बोलले मुख्यमंत्री?

  • धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण हवंय, तो अधिकार केंद्राचा आहे. यासाठी योग्य ती शिफारस केंद्र सरकारकडे तातडीने पाठवली जाणार…

दुष्काळावर बोलले मुख्यमंत्री?

  • दुष्काळासंदर्भात सर्व तयारी झालेली आहे, विरोधकांनी दुष्काळाचं राजकारण करण्याऐवजी मोलाच्या टिप्स द्याव्यात, शेतकऱ्यांना धीर मिळेल असं काही करावं.
  • मागच्या सरकारमध्ये केवळ टंचाई जाहीर केली जायची आणि जानेवारीत जीआर निघायचा, मग पुढे दोेन महिन्यांनी मदत यायची, यावेळी केंद्राकडे लगेच मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे.
  • दुष्काळाचे सर्व निकष तपासून 191 तालुके दुष्काळी घोषित केले, तक्रारी ऐकण्यासाठीही समितीची नियुक्ती

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/262645654599775/

Updated : 18 Nov 2018 12:55 PM GMT
Next Story
Share it
Top