Home > मॅक्स रिपोर्ट > नोकरी गेली पण खचला नाही महापुरुषांच्या विचाराने उभा राहिला..

नोकरी गेली पण खचला नाही महापुरुषांच्या विचाराने उभा राहिला..

नोकरी गेली पण खचला नाही महापुरुषांच्या विचाराने उभा राहिला..
X


कोविड महामारीने अनेक त्यांचे होत्याचं नव्हतं केलं. आपले सगे सोयरे गेले नोकरी गेल्या.. बबन सोनवणे या मुंबई प्रेस क्लब मध्ये सिक्युरिटी गार्डचं काम करणाऱ्या माणसावरही अशीच वेळ आली.. तो डगमगला नाही कारण त्याच्याजवळ होते महामानव आणि महापुरुषांचे विचार.. या माणसाने प्रेस क्लबच्या बाहेर एक धंदा सुरू केला सोबत विचारांची पेरणी सुरू केली ..आज तो समाधानी आहे आणि तेच विचार घेऊन पुढे जातोय ..पहा मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पॉन्डन्ट विजय गायकवाड यांनी बबन सोनवणे यांच्याशी केलेला व्हिडीओ आणि शब्दरुपी संवाद.....

विजय गायकवाड :

नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. कोविड काळातमध्ये अनेक चढउतार झाले. आपल्यापैकी अनेकाचं होत्याचं नव्हतं झालं आणि कुटुंबाची देखील वाताहत झाली. परंतु एक खरं आहे माणसामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर तो हरत नाही. असच एक उदाहरण माझ्यासोबत आहे. तुम्हाला माहिती असेल, मुंबईच्या मध्यवर्ती भागात म्हणून संस्था आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनन्स समोर ( CST)च्या अगदी समोर असलेल्या मुंबई प्रेस क्लबमधे एक सुरक्षा रक्षक ( security guard)म्हणून एक व्यक्ती होता. या कठीण काळात तो हरला नाही. संघर्ष करत राहिला काय काय नवीन नवीन त्यांनी गोष्टी केल्या. अगदी मुंबईपासून ते कर्जत पर्यंत फिरत असतो. त्या न हरलेल्या क्तीकडे आपण जाणार आहोत जाणून घेऊयात नेमकं त्यांनी या संकटातून बाहेर पडत समाजाला वैचारिक मार्ग देखील दाखवला आहे.

बबन सोनवणेः मी नोकरी गेल्यानंतर वेदनाशामक औषध विक्री सुरु केली. अंगदुखी पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी कुणाचा पाय मुरगळला तर याच्यासाठी आपण काही लावू आणि हे पूर्णपणे बरं करणारं औषध आहे. आपण पहिलं औषध लावून देतो मग गिऱ्हाईकांना पाच मिनिटात थांबा. तुम्हाला पंधरा ते वीस टक्के आराम भेटला तर विकत घ्या. असा आपला हा धंदा आहे. म्हणजे बिझनेर आहे.

विजय गायकवाड : तुम्ही ही औषधं कुठे कुठे विकताय?

बबन सोनवणे: मी मुंबईला CST समोर प्रेसक्लबच्या बाहेर विकतो, कर्जत, खोपोली, मुलुंड या प्रत्येक स्टेशनला एक एक दिवस देतो. आणि तिथे हा धंदा करतो.

विजय गायकवाड: मग किती विक्री होते साधारणत?

बबन सोनवणे : साधारण दिवसाला साधारण सरासरी बारा ते पंधरा औषधाचे पॅक विक्री होतात. शंभर रुपयाला एक. मग आधी जो पगार मिळत होता आणि याच्यापेक्षा जास्त आता नफा मिळतोय, आधी जो होता तो तीनशे रुपये रोजाप्रमाणं क्लबमधे महीना नऊ हजार रुपये पगार मिळायचा. इथे मला साधारणपणे दिवस पाचशे रुपये मिळतात.

शिवाय कुणाचाही दबाव नाही. मी मनमोकळेपणाने मी लोकांशी संपर्क साधू शकतो आणि वैचारिक देवाण घेवाणही होते. समाजाची लोकं भेटतात त्यांना मी जी सामाजिक पुस्तकं आहेत मी त्यांना माहिती देतो आणि विक्रीही करतो.

विजय गायकवाड:

काय काय वाचन केलंत आणि काय तुम्ही वाचायला देता लोकांना ?

बबन सोनवणे: आतापर्यंत लोकांना महात्मा फुले समग्र वागमूळे त्याशिवाय बाबासाहेबांची बाबासाहेब आंबेडकरांची चळवळीची पुस्तकं आहेत writing and speachesचे भाग त्याशिवाय क्रांती प्रतिक्रांती त्याच्यानंतर thoughts on Pakistan, शूद्र पूर्वी कोण होते? अस्पृश्य मूळचे कोण? या सर्व म्हणजे बहुजन समाजाच्याविकासाची किंवा वैचारिक व बांधणी जी आहे त्याची सर्व पुस्तकं मी लोकांना देत असतो.देतो आणि विकतही देतो.

विजय गायकवाड:

समाजात आजूबाजूला संविधान विरोधी विचार वाढत चाललेत, महापुरुषांची बदनामी होते आहे. तर त्या तुम्ही अस्वस्थ होता का? आणि काय करावंसं वाटलं तुम्हाला?

बबन सोनवणे :

हो अस्वस्थ तर वाटतंच. की पुढे या देशाचं काय होईल? किंबहुना सर्वसामान्य माणसाचं काय होईल? याच्याकडे माझं म्हणजे मला चिंता वाटते. त्यासाठी आम्ही एक संविधान जागृती असं अभियान काढलेलं आहे. तर त्याद्वारे आम्ही लोकांचं प्रबोधन करतो. संविधानात तुम्हाला काय हक्क आहे? आणि तुम्हाला आता ते कसे जगवतात याविषयी आम्ही माहिती देत असतो.

मी वैयक्तिकरित्या जे कोण भेटेल त्यांना देत असतो.

विजय गायकवाड :

काका आता सहा डिसेंबर झालं. तिथे जवळपास पन्नास कोटीची पुस्तकं विक्री झाली. पण लोकं पहिली तर डोक्यावर पुस्तकं घेऊन जात होती. तर प्रत्येक समाजाने वाचायला पाहिजे का?

बबन सोनवणे : हो प्रत्येक समाजाने वाचलं पाहिजे हं हं अगदी असं कुठचंही म्हणजे भेदभाव न करता लोकांनी बाबासाहेबांचे विचार शाहू फुलेंचे विचार हे समजावून घेतले पाहिजेत.

विजय गायकवाड:काका असं पण होत बऱ्याचदा आयुष्यामध्ये चढउतार येतात. तुमच्या आयुष्यात चढ-उतार आले, नोकरी गेली. पण तुम्ही हटला नाहीतर तुम्ही संघर्ष करत राहिलात. पुन्हा press clubने तुम्हाला नोकरीसाठी बोलावलं होतं, पण तुम्ही गेला नाही. काय कारण आहे?

बबन सोनवणे: हा याचं कारण असं की नोकरी म्हणजे ती नोकरी असते. आणि माझ्यावर मान्यवर कांशीरामांचा प्रभाव जास्त आहे. अच्छा बाबासाहेबांच्या नंतर कांशीरामचा प्रभाव आहे.

कांशीरामांनी स्वाभिमान शिकवला. आणि त्या स्वाभिमानाला अनुसरून म्हटलं आता नोकरी करायची नाही.

विजय गायकवाड :

ही तरुण मुलं तुम्ही आजूबाजूला पाहतात. ती ही थोडीशी चंगळवादाच्या दिशेने गेली. तर हा समाज आपला भारतीय समाज हा महापुरुषांच्या विचारांचा आहे. तर हे पुरुषांचे महापुरुषांचे विचार पुढं घेऊन जाण्यासाठी काय केलं पाहिजे? सरकारनी म्हणा किंवा त्यांच्या पालकांनी म्हणा किंवा समाजात नेमकं काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुळात म्हणजे नीती मूल्यावर आधारित समाज निर्माण केला पाहिजे. आज नीतिमूल्यांचा ऱ्हास होत चाललाय. आणि तो एक प्रकारचा वर्ग तयार करतोय. त्या वर्गाला कुठचाही आळा न घालता त्याला मोकाट सोडतात. त्या वर्गाला की जो चंगळवाद, मोबाईद्वारे असेल, किंवा गुटखा, पान, तंबाखू, दारू याच्याद्वारे असेल तर या समाजाला मुक्त सोडतात. मी लोकांना सांगतो व्यसनं सोडा.

त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे लोकांकडे लहानपणापासून संस्कार असतील तर कोणीही असं करणार नाही. असा माझा विश्वास आहे.

विजय गायकवाड:

मित्रांनो हे होते बबन सोनवणे चळवळीचा विचार असलेला माणूस कधी हारत नाही. तो लढत राहतो. हे एक त्यातून सिद्ध होतं नोकरी गेली परंतु हा माणूस थांबला नाही. हा उद्योग उभा करतोय. आणि विचार रुजवतोय. समाजामध्ये खऱ्या अर्थाने आणि भविष्याच्या पिढीला एक संदेश पण देतोय .तर हा सगळा जो संघर्ष आहे खरंच तो आहे आणि अशा व्यक्तींच्या आपण पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. भविष्यातही अशी संकटं तुमच्यावरती येतील परंतु संकटांना न डगमगता आपण पुढे जातच राहिलं पाहिजे कारण की महापुरुषांचे विचार तुमच्या सोबत आहेत ...मी विजय गायकवाड आपण पाहत राहा Max Maharashtra धन्यवाद.

Updated : 13 Dec 2022 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top