पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे सुतोवाच केले आहे. बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेसच्या झालेल्या पिछेहाटीमुळं ममता यांनी नैतिक पराभव स्विकारून राजीनामा द्यायचा निर्णय घेतलाय. लोकसभा निवडणूकीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, बंगालमध्ये सुरक्षा दलांनी आमच्याविरोधात काम केले. याठिकाणी आणिबाणीसारखी परिस्थीती निर्माण झाली होती. हिंदू मुस्लिम यांच्यात विभाजन करण्यात आलं. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळं आता मुख्यमंत्री पदावर राहणार नसल्याचं त्यांनी पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केलं.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेसची पिछेहाट झाली असून अनेक जागांवर त्यांना फटका सहन करावा लागलाय, भाजपानं २०१४ साली केवळ दोन जागा जिंकल्या होत्या यावेळी मात्र त्यांनी १८ जागांपर्यंत मुसंडी मारलीय तर टीडीपी ३४ जागांवरून २२ जागांवर आलीय. त्यामुळं याची नैतिक जबाबदारी स्विकारल्याचं त्यांनी सांगितलं.
Updated : 25 May 2019 1:46 PM GMT
Next Story