Home > मॅक्स रिपोर्ट > प्रजासत्ताक दिन विशेष : राष्ट्रगीतासाठी थांबणारे गाव !

प्रजासत्ताक दिन विशेष : राष्ट्रगीतासाठी थांबणारे गाव !

प्रजासत्ताक दिन विशेष : राष्ट्रगीतासाठी थांबणारे गाव !
X

देशाचे राष्ट्रगीत हा त्या देशाचा अभिमान असतो. आपल्या देशाचे राष्ट्रगीत तर देशाचे भक्तीगीत आहे, असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. या राष्ट्रगीताचा मान राखला जावा यासाठी राष्ट्रगीत सुरू असताना सगळ्यांनी स्तब्ध आणि ताठ उभे राहावे असा नियम आहे. एरवी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन किंवा कुठल्या विशेष कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत गायले जाते. पण महाराष्ट्रात एक असे गाव आहे ज्या गावात दररोज राष्ट्रगीत गायिले जाते आणि अख्ख गाव त्यावेळ स्तब्धपणे उभे असते.

प्रबळ इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि दृढ संकल्प असेल तर प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी गावच्या गावकऱ्यांनी असेच काहीसे केले आहे, ज्यानंतर भिलवडी हे गाव देशातील सहावे गाव आणि महाराष्ट्रातील पहिले नियमित राष्ट्रगीत वाजविणारे गाव बनले आहे. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या गावातील व्यापारी संघटनेने सुरु केलेली राष्ट्रगीताची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून अखंडीतपणे सुरु आहे. रोज सकाळी दिनविशेष त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणं आणि बरोबर ९ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्गीत असा दिनक्रमच ठरला आहे. व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टिमवरून हे राष्ट्रगीत लावलं जातं आणि त्याचा सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ मान राखतात.

सकाळचे ९ वाजले की सायरन वाजतो, त्यानंतर पब्लिक अॅड्रेस सिस्टीममधून राष्ट्रगीत सुरू होते. त्याआधीच लोक स्तब्धपणे थांबलेले असतात. नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकित होण्यासारखेच असते. मात्र, इथल्या ग्रामस्थांकसाठी हा एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयोग आहे. १५ ऑगस्ट २०२० पासून भिलवडीमध्ये PA प्रणालीद्वारे 'जन गण मन' हे राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास सुरुवात झाली तेव्हा काहींना वाटले की देशभक्तीचा उत्साह काही दिवसांत किंवा आठवड्यातच कमी होईल. मात्र, सर्व निष्कर्ष खोटे ठरले. दहा हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह जागृत झाला असून इथे दररोज राष्ट्रगीत होते. त्या वेळेला वाहनांतील नागरिकही राष्ट्रगीतासाठी खाली उतरतात. राज्यातील या छोट्याशा गावाने खूप देशभक्तीचा आणि एकीचा सकारात्मक संदेश दिला आहे.


Updated : 25 Jan 2022 11:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top