Home > Election 2020 > मुख्यमंत्र्यांच्या 'मेक इन महाराष्ट्र'ला झटका; स्वदेशी विमानाचं स्वप्न भंगलं

मुख्यमंत्र्यांच्या 'मेक इन महाराष्ट्र'ला झटका; स्वदेशी विमानाचं स्वप्न भंगलं

मुख्यमंत्र्यांच्या मेक इन महाराष्ट्रला झटका; स्वदेशी विमानाचं स्वप्न भंगलं
X

मोठा गाजा वाजा करत मोदींनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली. त्याच्या लाखो रुपयांच्या जाहीराती तुम्ही माध्यमांवरती पाहिल्यादेखील असतील. त्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मेक इन महाराष्ट्र’ ही योजना सुरु केली. या योजनेत सर्वात महत्वाचा करार म्हणजे... 35 हजार कोटीचा स्वदेशी विमान निर्मितीचा प्रकल्प! आता हा प्रकल्पच अमेरिकेत जाणार आहे.

काय आहे प्रकल्प?

पालघर परिसरात घराच्या छतावर स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन छोटेखानी विमान तयार करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांच्याशी 'मेक इन इंडिया' प्रकल्पांतर्गत एमआयडीसीनं 35 हजार कोटींचा करार केला होता. मात्र, राज्यातील लाल फितीला कंटाळून यादव यांनी हा प्रकल्प आता अमेरिकेत हलवण्याचा निर्णय़ घेतला आहे. अमेरिकेनं त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत महाराष्ट्रातच रोजगार निर्मिती व्हावी म्हणून सहा असनी विमान निर्मिती करण्यासाठी करार करण्यात आला होता. राज्य सरकारकडून पालघर परिसरात 157 एकर जमीन उपलब्ध करुन दिली जाणार होती. तसंच विमान निर्मिती आणि उड्डाण परवाना दिला जाणार होता.

मात्र, वर्ष होऊन देखील कॅप्टन अमोल यादव यांना ना जागा मिळाली आहे. ना उड्डाण परवाना... त्यामुळे अमोल यादवने हा प्रकल्प अमेरिकेत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या लाल फितीमुळे 35 हजार कोटीचा प्रकल्प जर अमेरिकेत गेला तर मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या #मेकइनमहाराष्ट् चं हे मोठं अपयश समजलं जात आहे.

Updated : 10 April 2019 5:16 AM GMT
Next Story
Share it
Top