News Update
Home > Election 2020 > राष्ट्रवादीची भिस्त आता तरुणांवर…

राष्ट्रवादीची भिस्त आता तरुणांवर…

राष्ट्रवादीची भिस्त आता तरुणांवर…
X

लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बलस्थानाबरोबरच निवडणुकीत पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष कुठे कमी पडला? य याबाबत चर्चा केली.

यावेळी शरद पवार यांनी प्रत्येक उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत आगामी विधानसभा संदर्भात उमेदवारांशी चर्चा केली.

तरुणांना संधी…

लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले ते डोक्यातून काढा. आपला पक्ष लोकांच्या प्रभावीपणे समोर कसा येईल, आपली विचारधारा लोक आपलीशी कशी करतील, हा एकच विचार आता, त्यासाठी प्रयत्न करा. आपण लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही तरुण चेहऱ्यांना संधी देऊ.

एक वेळ अशी होती की, आपल्यासोबतचे ५८ लोक साथ सोडून गेले होते. सभागृहात आम्ही फक्त जण होतो. मात्र आम्ही मेहनत घेतली आणि पुन्हा ६० लोक सभागृहात आणले. त्यात सर्व नवे चेहरे होते. आजची निवडणुकीनंतरची परिस्थिती इतकी वाईट नाही. तुम्ही ४० लोक आहात, तुमचा ४० लोकांचा एक संच आहे. तुम्ही खंबीरपणे लढा. असं म्हणत पवारांनी पक्षातील नेत्यांसह उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्या दमानं कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे.

या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी,ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ नेते विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,ज्येष्ठ नेते गणेश नाईक, खासदार माजीद मेमन,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, खासदार वंदना चव्हाण,खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार उदयनराजे भोसले, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख,राजेश टोपे, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आदींसह पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष, लोकसभा लढवलेले उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 1 Jun 2019 2:48 PM GMT
Next Story
Share it
Top