Home > मॅक्स किसान > महाराष्ट्रात साखर उत्पादन घटणार, ही आहेत कारणं...

महाराष्ट्रात साखर उत्पादन घटणार, ही आहेत कारणं...

महाराष्ट्रात साखर उत्पादन घटणार, ही आहेत कारणं...
X

देशात साखर उत्पादनात दोन नंबर वर असणाऱ्या महाराष्ट्रात यंदा साखर उत्पादनात घट होणार आहे. गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे तसंच महाराष्ट्रातील साखर पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात 2019-20 मध्ये 2018-19 च्या तुलनेत 39.2 टक्क्यांनी घट होऊन 65 लाख टन इतकेच साखरेचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा भारतीय साखर कारखानदारांवर अतिरिक्त साखर निर्यात करण्यासाठी जो दबाव टाकला जात होता. तो कमी होईल, त्याच परिणाम म्हणजे जागतिक बाजारात साखरेच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीपासून जागतिक बाजारात साखरेचे दर 20 टक्क्यांपेक्षा घसरले आहेत. त्यामुळे साखर उत्पादनात घट झाल्यामुळे साखरेच्या दरात वाढ होण्यास मदत होऊ शकते. महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात दुष्काळामुळे पिके खराब झाली असल्याने तसंच ऊसाचे क्षेत्र कमी उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

1 ऑक्टोबरपासून सुरू होणा-या 2019-20 या वर्षात ऊसाखालील क्षेत्र 28 टक्क्यांनी घटले आहे. या संदर्भात रॉयटर्सने वृत्त दिले असून 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या गाळप हंगामात वर्षात राज्यात 1.07 दशलक्ष टन साखर उत्पादन झाले असं या वृत्तात म्हटले आहे. त्यातच महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे दुष्काळामुळे राज्यात चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यानं शेतकऱ्याने ऊस जनावरांना खाऊ घातला त्याचाही साखर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता साखर आयुक्त गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, जून 2018 मध्ये जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रामध्ये सरासरी पेक्षा 23 टक्के कमी पाऊस पडला. गेल्या काही वर्षांत, ऊसाच्या लागवडीत आणि साखर उत्पादनात झालेल्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेच्या देशांतर्गत दरावर परिणाम झाला होता, त्यामुळे साखर कारखाण्यांना शेतकरी वर्गाला पैसे देणे अवघड झाले होते. ऊस थकबाकी आणि वाढता साठा कमी करण्यासाठी केंद्र सरकार कारखान्यांना परदेशात साखर विक्रीसाठी प्रोत्साहन पुरवीत असून 50 दशलक्ष टन साखर निर्यातीचे लक्ष्य यावर्षी ठेवण्यात आले आहे.

त्यातच महाराष्ट्रा स्थानिक आणि राज्याच्या राजकारणावर होत असतात. त्यामुळे महाराष्ट्रात साखरेचे दर आणि आणि उत्पन्न राज्याच्या राजकारणावर परिणाम करत असते.तील अनेक कारखाने हे राजकीय पुढाऱ्यांचे असल्याने साखरेच्या दराचा परिणाम करत असते.

Updated : 19 Aug 2019 11:40 AM GMT
Next Story
Share it
Top