Home > मॅक्स रिपोर्ट > महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा, जातपंचायतचं भयान वास्तव

महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा, जातपंचायतचं भयान वास्तव

महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा, जातपंचायतचं भयान वास्तव
X

जात पंचायतीच्या बाहेर जाऊन पुनर्विवाह केल्याच्या कारनावरून जात पंचांनी महिलेला एक लाख रुपये दंडासह, पंचांनी थुंकलेली थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सदर महिलेच्या फिर्यादी वरून अकोला जिल्ह्यातील नाथ जोगी समाज पंचायती चे सदस्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काय आहे नेमकं प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चाहर्डी गावातील माहेर असलेल्या अर्चना बोडके या महिलेचा अकोला जिल्ह्यातील वडगाव येथील साईनाथ नागो बाबर यांच्यासोबत 2011 साली विवाह झाला होता.

मात्र, विवाह नंतर साईनाथ बाबर हा सदर महिलेला दारू पिऊन बेदम मारहाण करीत असल्याने अर्चना हिने न्यायालयात दाद मागून फारकत घेतली होती.

जात पंचायत असताना, न्यालयात दाद मागून फारकत घेतल्याने संतप्त झालेल्या जातपंचायत सदस्यांनी जात पंचायत भरवित सदर महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना जातीच्या बाहेर काढीत बहिष्कार घातला होता.

पुन्हा जातीत समावेश करायचा असेल तर एक लाख रुपये देण्यात यावे. या शिवाय केळीच्या पानावर पंच थुंकतील ते चाटावे आणि डोक्यावर चपला घेऊन गाव भर फिरावे आणि दुसऱ्या पती पासून झालेल्या मुलीला मारून टाकावे, तरच जातीमध्ये समावेश केला जाईल अशा प्रकारची शिक्षा सुनावली असल्याची माहिती अर्चना बोडके यांनी दिली.

महिलेने पोलिसात तक्रार देऊ नये. यासाठी अकोला येथील जात पंचायत सदस्य आपल्या कुटुंबावर मोठा दबाव आणत असून कुटुंबाचं बरे वाईट करण्याच्या धमक्या देत आहेत.

आपल्यावर या जात पंचायत सदस्यांनी खूप मोठा अन्याय आणि अत्याचार केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अर्चना बोडके यांनी पोलिसांना केली आहे.

नाथजोगी समाजात मुलाला दोन तीन विवाह करण्याची मुभा आहे. मात्र, मुलींना पुनर्विवाह करण्यास परवानगी नाही. त्यामुळे सदर घटनेत पीडित अर्चना यांनी जात पंचायतीला न विचारता न्यायालयात जाऊन दाद मागितली आणि दारुड्या नवऱ्या पासून घटस्फोट घेऊन पुनर्विवाह केल्याचा राग धरून जात पंचायतीने गेल्या तीन वर्ष पासून आम्हाला जाती बाहेर काढले असून जाती मधील कोणत्याच धार्मिक समारंभाला तसेच विवाह समारंभाला हजर राहू दिले जात नाही.

आमच्या मुलांचे विवाह होऊ दिले जात नाही. अशा प्रकारचा खूप त्रास दिला जात असून आमचं जगणं कठीण झालं असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. महिलांना पुनर्विवाह करण्याची परवानगी मिळून द्यावी अशी मागणी ही यावेळी बाबर यांनी केली आहे

अनिस ची भूमिका -

अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कायदे करण्यात आलेले असले तरी अशा प्रकारच्या घटना या समोर येत आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी जात पंचायती बरखास्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कसोशीने प्रयत्न करत आहे. असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलं आहे.

ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो.

या संदर्भात सरकारने जात पंचायत विरोधात कायदे केले असले तरी अशा प्रकारच्या घटना या समोर येत आहे. म्हणून अनिस अशा घटनांचा पाठ पुरावा करीत असल्याची माहिती जात पंचायत मूठ माती अभियान समितीचे कार्य वाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे

काळिमा फासणारी घटना; महिला संघटना -

कायद्यानुसार कोणत्याही जात पंचायतीला जात पंचायत भरवत अशा प्रकारची शिक्षा देण्याचा अधिकार नाही. या जात पंचायतीने दिलेली शिक्षा ही अतिशय घृणास्पद आहे, मानवजातीला काळीमा फासणारी ही घटना आहे. अशा प्रकारचा जात पंचायतीच्या निर्णय हा कायद्याला धरून नसल्याने समाजाने ही हे घ्यायला पाहिजे अस मत महिला संघटना प्रतिनिधी वासंती दिघे यांनी म्हटलं आहे

महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार कायद्या नुसार गुन्हा; पोलीस अधीक्षक

या घटनेच्या संदर्भात पीडित महिलेने दिलेल्या माहिती नुसार कायद्यानुसार पहिल्या पती पासून फारकत घेऊन पुनर्विवाह केला म्हणून जात पंचायतीने पीडित महिलेसह चार कुटुंबावर बहिष्कार घालून एक लाख रुपये देणे आणि आणि पंचांनी थुंकलेले चाटणे अशा प्रकारची शिक्षा तिला ठोठावली होती.

या घटनेच्या विरोधात चोपडा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत जात पंचयतीच्या काही सदस्यांविरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला

आहे. अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिस ठाण्यात तो वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.Updated : 2021-06-05T21:57:06+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top